---Advertisement---
राष्ट्रीय कृषी बाजारभाव महाराष्ट्र

दुर्दैव : कधीकाळच्या पांढऱ्या सोन्याला आता मिळतोय कवडीमोल भाव !

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जानेवारी २०२३ । पांढऱ्या सोन्याला म्हणजेच कापूस. कित्येक वर्षा आधी कापसाचा आणि सोन्याचा भाव सारखाच होता असं म्हटलं जात. मात्र आता याच कापसाला चांगला भाव मिळेनासा झाला आहे. बळीराजाला कवडीमोल भावाने कापूस विकावा लागत असल्याने शेतकऱ्यांनी कापूस घरातच साठवून ठेवला आहे. (low cotton price in jalgaon district)

cotton

तर दुसरीकडे आर्थिक व्यवहार मंदावले आहे. ग्रामीण शेतकऱ्याला कापूस विकावा लागत असल्याने हलाकीचे दिवस पाहावे लागत आहेत. याचबरबर कापूस घरात ठेवल्याने अंग खाजविण्याचे विकार वाढत आहेत आणि कापूस चोरीच्या घटना देखील वाढल्या आहेत. (rate of cotton in jalgaon)

---Advertisement---

गतवर्षी कापसाने दरात विक्रमी उच्चांक गाठला. कापूस हंगामाच्या शेवटी तर हा दर १२ ते १३ हजार रूपये क्विंटलपर्यंत पोहचला होता. मात्र यंदा कापसाचे दर सध्यस्थितीत ७९०० ते ८१०० प्रतिक्विंटलपर्यंत आहेत. जळगाव जिल्हा केळी सोबत कापूस उगवणारा जिल्हा म्हूणून ओळखला जातो. मात्र कापसाचे भाव वाढतील कधी ? हे कोणालाच माहित नाही. पर्यायी शेतकऱ्याने काय करावे? हाच प्रश्न त्याला पडला आहे. (higgest cotton rate)

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---