⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | मुस्लिम कब्रस्थान व फारुक शेख यांचा न विसरणारा अनुभव

मुस्लिम कब्रस्थान व फारुक शेख यांचा न विसरणारा अनुभव

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ०८ एप्रिल २०२१ । गेल्या दीड वर्षापासून रोज मोबाईल बघितला टीव्ही बघितली पेपर बघितला की मृतांच्या संख्यांची यादी येते पण, ह्या दीड वर्षात करोणा मध्ये मृत झालेल्या व्यक्तींच्या परिवाराला काय दुःख आणि वेदना सहन कराव्या लागल्या असतील ते पहिल्यांदाच खूप जवळून, अनुभवलं. बीजेपीच्या उपाध्यक्ष शरीफा तडवी खूप जवळची मैत्रीण होती अतिशय निष्पाप निस्वार्थ मैत्री जपणारी तिच्याकडे बघून कधीही वाटलं नाही इतक्या लवकर सोडून जाईल. वीस दिवस तिने करोनाशी आणि मृत्यूशी झुंज दिली फक्त लेकरांसाठी, आणि शेवटचा श्वास माझ्या डोळ्यासमोर सोडला आणि ती बातमी तिच्या लेकरांना देण्याची जबाबदारी डॉक्टरांनी मला सांगितली,आयुष्यातला सगळ्यात भयंकर फेज मी अनुभवला.. 

आपल्या पक्षासाठी निष्ठा, लोकसंपर्क कोणाशी वैर नाही, प्रत्येकाच्या सुखदुःखात सर्वात आधी ,तिच्या घरी गेलेलं कुणी न जेवता आलं नसेल, आणि जेव्हा तिचा मृत्यू झाला मी खूप कॉल केले परिवार लेकर दुःखात होते दोन दिवस आधी आईचे निधन झालं होतं ,नवरा आयसीयूमध्ये होता, तर बघणार कोण मनोज म्हणून एक मानस  भाऊ आणि मी आणि काही मैत्रिणी, दोन वाजता तिचा मृत्यू झाला.

ॲम्बुलन्स साठी  व अंत्यविधीसाठी बऱ्याच लोकांना मी कॉल केले शेवटी एक कॉल मन्यार बिरादरीचे श्री फारुक शेख सर यांना लावला मी पण दुःखात होती घाबरलेली होती , ते मला बोलले बेटा घाबरू नको मी गाडी पाठवतो आणि दहा मिनिटात गाडी आली मी बोलली की अंत्यविधीसाठी लागणारं सामान, काही असेल कपडे आणावे लागतील का तर ,ते बोलले तू काहीच काळजी नको करू निश्चिंत रहा आणि मी तशीच परिवारासोबत शरीफा ताईला  इदगाह कब्रस्थान  (स्मशानभूमी )पर्यंत नेल. तिथे आयुष्यात प्रथमच गेले.

 फारूक शेख सर स्वतः तिथे उपस्थित होते,( तोंडाला मास्क, हातात ग्लोज घालून)ते डायबेटीस  चे गंभीर पेशंट आहेत, साडेतीन वाजेपर्यंत त्यांनी स्वतः उपाशी राहून भर उन्हामध्ये सर्व अंत्यविधीची पद्धती पार पाडली स्वतः संपूर्ण डेथ बॉडी जी बॅग मध्ये होती तिच्यावर पाणी व सॅनिटाइझ  केलं, स्वतःच्या घरातील पेशंट आहे असं समजून काळजीपूर्वक सर्व विधी संपन्न केला.मौलाना ला बोलवून घेतले ( कफन,जनाजा  नमाज,6 बाय 3 चा खड्डा (कबर) करून त्यात पुरविले)  परिवारातले लेकरांचे सांत्वन केलं.

 तिची झुंज देत असताना फोनद्वारे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष बऱ्याच लोकांनी नेत्यांनी तिला मदत करण्याचा प्रयत्न केला. नाथाभाऊ, रोहिणी ताई आज बीजेपीत नसले तरीदेखील त्यांनी टोकाचे प्रयत्न केले असतील, राजू मामांना कळल्यानंतर ते देखील हॉस्पिटल मध्ये आले ,. पण तिच्या शेवटच्या क्षणी स्मशान भूमी मध्ये एक व्यक्ती त्यांना पुर्ण ओळखतही नसेल, त्या व्यक्तीने जीवाची परवा न करता स्वतःची काळजी न करता त्यांचा संपूर्ण अंत्यविधी  फक्त अर्धा तासात पार पडला, तिथे कोणी राजकारणी समाजकारणी नव्हतं, तिथे होते फक्त आणि फक्त, फारुख शेख सर *अल्लाह के बंदे

 – सरीता माळी-कोल्हे
संस्थापिका साहस फाउंडेशन

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.