⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | भुसावळ | भुसावळातील बेरोजगाराला नोकरीच्या आमिषाने 45 हजारांचा गंडा

भुसावळातील बेरोजगाराला नोकरीच्या आमिषाने 45 हजारांचा गंडा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जून २०२१ । भुसावळमधील शांती नगरातील रहिवासी शुभम अजय पाटील (20) या बेरोजगार तरुणाला नोकरीच्या आमिषाने 45 हजारांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

वेळोवेळी उकळले पैसे

शुभम पाटील यांच्या तरुणाच्या मोबाईलवर 14 जून रोजी सायंकाळी 7302181754 या क्रमांकावरील जसिका सिंग नामक तरुणीने नोएडाच्या हायर हंडर कंपनीतून बोलत असल्याचे सांगत गोदरेज अ‍ॅण्ड बॉईज कंपनीत जॉब मिळाल्याचे सांगत रजिस्ट्रेशन करण्यास सांगितले. त्यासाठी लिंग पाठवण्यात आली व रजिस्ट्रेशन करून त्यासाठी फी 150 रुपये भरल्यानंतर 16 रोजी पुन्हा रजिस्ट्रेशन व्हेरीफिकेशनसाठी दोन हजार 200 रुपये, जॉब इन्शुरन्ससाठी पाच हजार पाचशे रुपये, खाते उघडण्यासाठी दहा हजार रुपये तसेच जॉब बॉडींगसाठी 15 हजार रुपये व फाईल अप्रुव्ह करण्यासाठी 12 हजार रुपये उकळण्यात आले.

19 रोजी पुन्हा संबंधितानी तरुणाला खाते ब्लॉक झाल्याने ते अनलॉक करण्यासाठी 20 हजार रुपये मागितले असता तरुणाने आधीचे भरलेले पैसे मागितले मात्र आधी रक्कम पाठवा, नंतर पैसे परत करू, अशी भूमिका संबंधितानी घेतल्याने तरुणाला फसवणूक झाल्याची खात्री झाल्याने त्याने शहर पोलिसात धाव घेतली. 48 हजार 850 रुपये वेळोवेळी उकळून फसवणुक केल्याप्रकरणी जसिका सिंग (नाव, गाव माहित नाही, मो.9105973842) विरुद्ध शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.