“हर घर तिरंगा” उपक्रमा अंतर्गत सावदा येथे काढली तिरंगा रॅली !

ऑगस्ट 13, 2022 7:23 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑगस्ट २०२२ । स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सावदा नगरपरीषदे तर्फे भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीत सावदा येथील आ.गं. हायस्कूल, ना. गो. पाटील ज्यू. कॉलेज, ना. वि. ह. पाटील विद्या मंदिर व अंग्लो उर्दू हायस्कूल येथील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सहभाग घेतला होता. रॅली सावदा येथील आ.गं. हायस्कूलच्या आवारातून संभाजी चौक ते बस स्थानक रोड कडून फैजपूर यथील धनाजी नाना महाविद्यालय येथे भेट देण्यासाठी गेली. या ठिकाणी विद्यार्थिनीनी पथनाट्य करून जनजागृती केली.

हार हार तिरंगा jpg webp

या रॅलीत सावदा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण, माजी नगराध्यक्ष राजेंद चौधरी, सावदा पोलीस स्टेशन चे सहायक पोलीस निरीक्षक देविदास इंगोले, पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड, आ.गं. हायस्कूल व ना. गो. पाटील ज्यू. कॉलेज चे मुख्याध्यापक सी. सी. सपकाळे, सावदा नगरपरिषदेचे स्थापत्य अभियंता अविनाश गवळे, पाणीपुरवठा अभियंता जितेश पाटील, लेखापाल विशाल पाटील, लेखापरीक्षक भारती पाटील, आरोग्य निरीक्षक महेश चौधरी, सतीश पाटील, किरण चौधरी, आकाश तायडे, विजय चौधरी व इतर कर्मचारी वर्ग तसेच आ.गं. हायस्कूल चे नंदू पाटील सर, संजय महाजन सर, तसेच सर्व शिक्षक वृंद सहभागी होते. फैजपूर येथे रॅली मधील सर्व विध्यार्थाना कॉंग्रेसचे अधिवेशना विषयी माहिती देण्यात आली यावेळी धनाजी नाना महाविद्यालय येथील सर्व प्राचार्य प्राध्यापक उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now