⁠ 
बुधवार, जुलै 24, 2024

फळाचा केक कापून वाढदिवस साजरा ; कार्यकर्त्यांच्या प्रेमाने डॉ. उल्हास पाटील गेले भारावून..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । 26 फेब्रुवारी 2024 | २३ फेब्रुवारी रोजी माजी खा.डॉ.उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावचे भाजपा कार्यकर्ते प्रा. विजय चौधरी,अनिल महाजन यांनी फळाचा केक बनवून आणत साजरा केला. यावेळी कार्यकर्त्यांच्या प्रेमाने माजी खा. डॉ. उल्हास पाटील भारावून गेले.

जळगावातील बायोमेडीकल इंजिनिअर असलेले प्रा. विजय चौधरी आणि अनिल महाजन यांनी आपल्या लाडक्या नेत्याला आगळयावेगळया शुभेच्छा देण्यासाठी कलींगड, ड्रॅगन फ्रुट, पपई,किवी, डाळींब, सत्री आणि मोसबीसह अनेक फळांचा उपयोग करून एक आगळा वेगळा केक तयार करून आणला यावेळी वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्टाता डॉ.प्रशांत सोळंके, वैद्यकिय अधिक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्या उपस्थीतीत माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते या केकचे कटींग करण्यात आले.

कार्यकर्त्यांच्या या प्रेमाने डॉ. उल्हास पाटील भारावून गेले.अभियंता हा देशाचा पाया आहे आणि त्यांच्या डोक्यातून नवनवीन संकल्पना संशोधनातून बाहेर येवू शकतात ही संशोधक वृत्‍ती कायमस्वरूपी अशीच ठेवून देशाची सेवा करण्याचे आवाहन यावेळी डॉ. पाटील यांनी केले आणि प्रा विजय चौधरी, अनिल महाजन यांना आर्शिवाद दिले.