⁠ 
सोमवार, एप्रिल 22, 2024

भुसावळमार्गे धावणार उधना-मालदा टाउन विशेष रेल्वे ; आजपासून बुकिंग सुरु

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२३ । उन्हाळ्या सुट्ट्यांमुळे रेल्वे गाड्यांमध्ये होणारी गर्दी लक्ष्यात घेऊन भारतीय रेल्वेडून विविध भागात अनेक उन्हाळी विशेष गाड्या सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच दरम्यान, आता पश्चिम रेल्वेने उधना ते मालदा टाउन (Udhna-Malda Town special train) दरम्यान उन्हाळी विशेष ट्रेन विशेष भाड्याने चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी भुसावळ जंक्शनवरून धावणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

गाडी क्रमांक 09011 उधना – मालदा टाउन सुपरफास्ट स्पेशल उधना येथून दर गुरुवारी रात्री 23.00 वाजता सुटेल आणि मालदा टाउनला दुसऱ्या दिवशी शनिवारी रात्री 21.30 वाजता पोहोचेल. ही ट्रेन 4 मे ते 22 जून दरम्यान धावणार आहे. त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक 09012 मालदा टाउन – उधना स्पेशल मालदा टाऊन येथून दर रविवारी 09.05 वाजता सुटेल आणि मंगळवारी 01.20 वाजता उधना येथे पोहोचेल. ही ट्रेन 7 मे ते 25 जून दरम्यान धावणार आहे.

या स्टेशनांना असेल थांबा?
ही गाडी नंदुरबार, भुसावळ, खांडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज छेओकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय, बक्सर, आराह, पाटणा, बख्तियारपूर, मोकामा, किउल, अभयपूर, जमालपूर, सुलतानगंज, भागलपूर, कहालगाव, भागलगंज येथे थांबेल. दोन्ही दिशेने., बरहरवा आणि न्यू फरक्का स्थानकावर थांबेल. या ट्रेनमध्ये एसी 2-टायर, एसी 3-टायर, स्लीपर आणि द्वितीय श्रेणीचे सामान्य डबे असतील.

ट्रेन क्रमांक 09011 चे बुकिंग आज म्हणजेच 26 एप्रिलपासून सर्व PRS काउंटरवर आणि IRCTC वेबसाइटवर सुरू होईल. गाड्यांचे थांबे, रचना आणि वेळ याबद्दल तपशीलवार माहितीसाठी, प्रवासी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट देऊ शकतात.