⁠ 
मंगळवार, डिसेंबर 3, 2024
Home | जळगाव जिल्हा | शरद पवारानंतर आता जळगावात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार ; ‘या’ तारखेला घेणार सभा..

शरद पवारानंतर आता जळगावात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार ; ‘या’ तारखेला घेणार सभा..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ सप्टेंबर २०२३ । एकीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असून दुसरीकडे राजकीय पक्षाकडून आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर जळगावात शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thakeray) यांची तोफ धडाडणार आहे

१० सप्टेंबरला जळगावात ठाकरेंच्या सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. या सभेच्या माध्यमातून ते जनतेशी संवाद साधणार असल्यामुळे त्यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी काल मंगळवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची जळगावात सभा झाली. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार जळगावात आले.

त्यांनतर आता उद्धव ठाकरे १० सप्टेंबरला जळगाव जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. त्यामुळे आता ठाकरे गट जळगाव जिल्ह्यात पुन्हा एकदा ताकदीने उतरणार, हे स्पष्ट झाले आहे. जळगावात शिवसेना ठाकरे गटात जुने व नवीन असा वाद आहे. हा वाद सोडविण्याचे आव्हान त्यांच्यापुढे असणार आहे. त्याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सोबत बंड केलेले मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांचा ठाकरे कसा समाचार घेणार? याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.