उद्धव ठाकरे यांनी आपल्याला धोका दिला, आता त्यांना.. – अमित शाह
जळगाव लाईव्ह न्यूज | ५ सप्टेंबर २०२२ | उद्धव ठाकरे यांनी आपल्याला धोका दिला आहे. आता त्यांना शिक्षा झालीच पहिले कारण, जे धोका देतात त्यांना योग्य शिक्षा झालीच पाहिजे. भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने जमीनीवर उतरुन काम केलं पाहिजे. मुंबई जिंकली पाहिजे असे अमित शाह मुंबईत म्हणाले.
भारताचे गृहमंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित शहा हे मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना दिसले. यावेळी अमित शाह म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला धोका दिला आणि राजकारणात तुम्ही काहीही सहन करा मात्र धोका सहन करू नका.
याचबरोबर पुढे बोलताना ते असेही म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे भारतीय जनता पक्षाला शिवसेनेने धोका दिला. त्याचे उत्तर त्यांना मिळालं आहे. हिंदुत्ववादी विचारसरणी विरोधात शिवसेनेने युती केली होती. यामुळे महाराष्ट्रातील आता आपल्याला हिंदू विरोधी विचारांना बाहेर काढून टाकायचा आहे यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या तयारीला सगळ्यांनी लागला पाहिजे.
मुंबई महानगरपालिकेमध्ये सर्वाधिक जागा या भारतीय जनता पक्षाच्या हव्या. सगळ्यांनी एकत्र येत आता मुंबई महानगरपालिका जिंकायची आहे १५०हून अधिक जागा जिंकायचे आहेत.याचबरोबर अमित शाह यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला. यावेळी ते म्हणाले की 2014 साली फक्त दोन जागांसाठी शिवसेनेने भारतीय जनता पक्षाशी युती तोडली याचबरोबर शिवसेनेने फक्त युतीच नाही तोडली तर भारतीय जनता पक्षाचा उमेदवारांना पराभूत करायचं कामही शिवसेनेने केलं.