ज्याला कावीळ असते त्याला जग पिवळं दिसतं अशी अवस्था उद्धव ठाकरेंची झालीय – रामदास कदम
जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑक्टोबर २०२२ । उद्धव ठाकरेंना किती अभ्यास आहे माहिती नाही. अद्यापही पाऊस सुरू आहे. पंचनामे झाले नाही. पंचनामा होत नाही तोवर मदत जाहीर करता येत नाही त्याची कल्पना उद्धव ठाकरेंना नसावी असं रामदास कदम म्हणाले.
ज्याला कावीळ असते त्याला जग पिवळं दिसतं अशी अवस्था उद्धव ठाकरेंची झालीय. अडीच वर्ष कधी ते घराबाहेर पडले नाही. केवळ २-३ दिवस मंत्रालयात आले. यामुळे अडीच वर्षात कुठलाही निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली नाही. कोकणात वादळ आले. मात्र कोकणवासियाचे अश्रू पुसण्यासाठी उद्धव ठाकरे गेले नाहीत. आदित्य ठाकरेही गेला नाही. असे रामदास कदम म्हणाले
याच बरोबर रामदास कदम म्हणाले की, उद्धव ठाकरेंना किती अभ्यास आहे माहिती नाही. अद्यापही पाऊस सुरू आहे. पंचनामे झाले नाही. पंचनामा होत नाही तोवर मदत जाहीर करता येत नाही त्याची कल्पना उद्धव ठाकरेंना नसावी. फक्त दिखावा करण्यासाठी दौरा केला. अजित पवारांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा आणि उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेते व्हावे असं मला वाटतं हे कदमांनी सांगितले.