⁠ 
शनिवार, डिसेंबर 14, 2024
Home | जळगाव जिल्हा | आपली औकात काय? बोलवं किती?.. ‘त्या’ टिकेवरून मंत्री गुलाबराव पाटील संजय राऊतांवर बरसले

आपली औकात काय? बोलवं किती?.. ‘त्या’ टिकेवरून मंत्री गुलाबराव पाटील संजय राऊतांवर बरसले

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जून २०२४ । लोकसभा निवडणुकीच्या निकालात एनडीएला बहुमत मिळालं असलं तरी भाजपचा महाराष्ट्रात दारूण पराभव झाला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात जरी अपयश आलं असलं तरी जळगाव जिल्ह्यात आम्हाला दोघेही जागांवर विजय मिळवता आला असल्याचं मंत्री पाटील म्हणाले. अपयश शोधण्याचा आमचा प्रयत्न असेल लोकांनी आम्हाला का नाकारल यांची कारण शोधण्याची गरज असल्याचं ते म्हणाले.

एक्झिट पोलमध्ये ठाकरे गटाला दहा जागा व आमच्या शिंदे गटाला पंधरा जागा मिळतील, असा अंदाज मी वर्तविला होता. मात्र शेवटी जनतेने दिलेला निर्णय मान्य केला पाहिजे. महाराष्ट्रात निश्चितपणाने आम्हाला फटका बसला आहे तो आम्ही स्वीकारतो. प्रत्येकाला वाटतं की आपलं सरकार यावं शेवटी तिथं डोकी मोजले जातात आणि ती एनडीएकडे जास्त आहेत. लोकशाहीमध्ये कोणीही हरू शकत कोणीही जिंकू शकत शेवटी जनता श्रेष्ठ आहे जनतेने इंदिरा गांधी यांनाही पराभूत केल आहे पूर्वी राजाच्या पोटी राजा जन्माला यायचा आता राजा मतदार पेटीतून जन्माला येतो. असंही मंत्री पाटील म्हणाले

लोकसभा निकाल काहीही लागले तरी त्याचा विधानसभा निवडणुकीवर परिणाम होणार नाही. विधानसभा निवडणुकीत लोकांची असलेल्या संपर्क आणि केलेली विकास कामे यावरच मतदान होते, असे ते म्हणाले.

दरम्यान यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवरही निशाणा साधला आहे. निकालानंतर संजय राऊतांनी पंतप्रधान मोदी यांच्यासह भाजपवर निशाणा साधला आहे. 240 हा भाजपचा आकडा नाही हा तर ईडी सीबीआयचा आकडा आहे.ईडी सीबीआयने जेवढं बहुमत आहे तेवढ आणले आहे.आता मोदींची गॅरंटी संपली. दोन बाबूवर मोदी यांचं सरकार अवलंबून असल्याचं राऊत यांनी म्हटलं होते. आता राऊतांच्या टीकेचा मंत्री पाटीलांनी समाचार घेतला.

पंतप्रधान मोदींवर बोलावं… आपली उंची किती? आपला पगार किती? आपली औकात काय? बोलवं किती? असे सवाल केले आहेत इतकंच नाहीतर संजय राऊत यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीला उभं राहिला पाहिजे होतं. का उभे राहिले नाहीत? असा थेट सवालही मंत्री गुलाबराव पाटलांनी राऊतांना केला.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.