---Advertisement---
गुन्हे भुसावळ

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक ; भुसावळातील दोन तरुण ठार

accident
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जून २०२१ । अज्ञात वाहनाने दुचाकीला उडविल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी भुसावळ शहरातल्या नाहाटा कॉलेजवळच्या उड्डाणपुलावर घडली.  दरम्यान, घटनास्थळावरून वाहनचालक फरार झाला आहे.

accident

भुसावळमधील नाहाटा कॉलेज जवळचा उड्डाण पुल हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असला तरी याच्या एका बाजूचे काम अद्यापही सुरू आहे. यामुळे फक्त एकाच बाजूने वाहतुक सुरू आहे. रात्री नऊच्या सुमारास दुचाकीवरून जाणार्‍या दोन जणांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात ते दोन जण जागीच ठार झाले. हा अपघात इतका भीषण होता की, यामुळे दुचाकीचे अक्षरश: तुकडे झाले आहेत. तर अज्ञात वाहन चालक हा घटनास्थळावरून आपले वाहन घेऊन फरार झाला. 

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---