Jalgaon : एक लाखाची लाच मागणारे दोन वायरमन एसीबीच्या जाळ्यात
जळगाव लाईव्ह न्यूज । १ जानेवारी २०२५ । जळगावातून पुन्हा एकदा लाचखोरीची बातमी समोर आलीय. वीज मीटर नादुरुस्त असून गुन्हा दाखल होऊ नये यासाठी एक लाख रुपयांची लाच मागणारे दोन वायरमन (पूर्ण नाव समजू शकले नाही) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाच्या जाळयात अडकले
जळगावातील 30 वर्षीय तक्रारदार यांच्या घरचे पाच वीज मीटर महावितरणच्या भरारी पथकाने काढून नेले व ते नादुरुस्त असल्याचे सांगितले. या प्रकरणात वीजचोरीचा गुन्हा दाखल होऊ द्यायचा नसल्यास एक लाख ५० रुपयांची मागणी केली. यात तडजोडीअंती एक लाख रुपये स्वीकारण्याचे दोघांनी मान्य केले. या विषयी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
पथकाने लाचेच्या मागणीविषयी पंचांसमक्ष खात्री केली असता एका मीटरसाठी ३० हजार रुपये याप्रमाणे एकूण एक लाख ५० हजार रुपये मागितले. मात्र, एक लाख रुपयांमध्ये तडजोड झाल्याचे समोर आले. त्यानुसार पथकाने या दोघा वायरमनला मंगळवारी (३१ डिसेंबर) ताब्यात घेतले.