⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

संविधान साक्षरतेसाठी जळगावच्या तरुणाचा सायकलद्वारे ५ हजार किलोमीटरचा प्रवास‎

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ फेब्रुवारी २०२२ । भारतीय स्वातंत्र्याच्या‎ अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त‎ संविधानाचा प्रचार-प्रसार‎ करण्यासाठी जळगाव येथील मुकेश‎ कुरील यांनी सायकल यात्रा काढली.‎ त्यात कुरील हे ३२ जिल्ह्यातून ५‎ हजार किलोमीटरचा प्रवास करताना‎ संविधान जागर करतील. या यात्रेची‎ सुरूवात काल जळगावपासून‎ झाली. नंतर भुसावळात दाखल‎ होताच बसस्थानक परिसरातील डॉ.‎ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ‎ त्यांचे स्वागत करण्यात आले.‎

संविधानाने दिलेले अधिकार,‎ कर्तव्याची माहिती सर्वांना व्हावी,‎ संविधानाचे वाचन व त्यानुसार‎ आचरण व्हावे असा सायकल‎ यात्रेचा उद्देश आहे. २७ फेब्रुवारी ते ९‎ एप्रिलपर्यंत ही यात्रा चालेल. या‎ यात्रेचे रविवारी भुसावळ येथे डॉ.‎ बाबासाहेब आंबेडकर पुतळा, तर‎ वरणगाव येथे बसस्थानक चौकात‎ स्वागत झाले. या ठिकाणी डॉ.‎ बाबासाहेब आंबेडकर यांना‎ अभिवादन करून संविधान‎ उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.‎

यांची उपस्थिती होती

पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता‎ सुभाष लोखंडे, किन्ही येथील‎ सर्वोदय हायस्कूलचे मुख्याध्यापक‎ तथा चोपडा पं.स.चे माजी सभापती‎ डी.पी.साळुंखे , भुसावळ तालुका‎ मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष‎ जे.पी.सपकाळे, तळवेल येथील‎ पंडित नेहरू विद्यालयाचे पर्यवेक्षक‎ एस.एस.अहिरे, संघटना‎ जिल्हाध्यक्ष प्रशांत नरवाडे,‎ कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे‎ मार्गदर्शक अशोक बाह्रे, इबटा‎ संघटनेचे जिल्हाध्यक्ष‎ आर.आर.धनगर, प्रमोद खैरे,‎ ग.स.सोसायटीचे माजी तज्ञ‎ संचालक योगेश इंगळे, प्राथमिक‎ शिक्षक पतपेढी चे संचालक प्रदीप‎ सोनवणे, रेखा सोनवणे, सुप्रभा‎ आनंद संस्था संचालक निरंजना‎ तायडे, रोटरी क्लब ऑफ‎ भुसावळ ताप्ती व्हॅलीचे सचिव‎ जीवन महाजन, आनंद शिंदे,‎ कास्ट्राईब शिक्षक संघटना‎ तालुकाध्यक्ष समाधान जाधव,‎ जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ चे‎ सचिव सुनील वानखेडे , नीलेश‎ बोरा उपस्थित होते. वरणगाव येथे‎ रॅलीचे स्वागत करण्यात आले.‎

निवेदन, विचारवंतांची भेट‎

अनेक लोकांनी अजूनही संविधान‎ वाचले नाही किंवा पाहिले नाही.‎ मात्र, ते वाचल्यास अधिकार व‎ कर्तव्यांची जाणीव होईल. यासाठी‎ प्रबोधनाची जबाबजिल्हाधिकाऱ्यांना‎ निवेदन देणे, सर्वसामान्यांना‎ संविधानाची प्रत दाखवून ते‎ वाचण्यास प्रवृत्त करणार आहेत.‎