⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

देवकर बीएससी नर्सिंग महाविद्यालयाला शासनाची मान्यता ; प्रवेश प्रक्रिया सुरू

जळगाव लाईव्ह न्यूज । ०९ मार्च २०२२ । येथील शिरसोली रस्त्यावरील श्रीकृष्ण शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ संचलित श्री गुलाबराव देवकर नर्सिंग कॉलेजमध्ये सन 2021 – 22 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी ही सुवर्णसंधी चालून आली आहे. हे महाविद्यालय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न आहे.

देवकर बीएससी नर्सिंग महाविद्यालयात प्रथम वर्षासाठी साठ जागांवर प्रवेश देण्यास शासनाने मान्यता दिली आहे, त्यानुसार ही प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.महाविद्यालयातील संपूर्ण स्टाफ हा उच्चशिक्षित असून, महाविद्यालयासाठी अद्ययावत सुविधा आणि इमारत संस्थेने उपलब्ध करून दिली आहे.

प्रवेशासाठी पात्रता :
बारावी सायन्स फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी व इंग्लिश या विषयांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्याला किमान 45% गुण असणे आवश्यक. आरक्षित प्रवर्गासाठी 40 % गुण आवश्यक.
नीट परीक्षा अॅपियर असणे आवश्यक.
वयोमर्यादा किमान 17 वर्षे

खानदेशातील विद्यार्थ्यांना नर्सिंगच्या शिक्षणासाठी ही मोठी संधी असून, प्रवेशासाठी 7620380833 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महाविद्यालयातर्फे करण्यात आले आहे.