अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

जून 7, 2021 1:24 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ०७ जून २०२१ । जळगाव जवळील बांभोरी बसस्थानकासमोर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार युवकाचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली आहे. शाहिद शकिल बागवान (वय-२२) असे अपघातातील मृत तरुणाचे नाव आहे. तर सोबत असलेला एक जण जखमी झाला आहे.  याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

bambhori

याबाबत असे की, , शाहिद बागवान हा आपल्या आईवडील आणि तीन बहिणींसोबत राहतो. शहरातील आंबे विक्री व किरकोळ व्यापारीचे काम करायचा, त्यांचे वडील त्याला थोडेफार हातभार लावत होते. रविवारी ६ जून रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास मित्रासह दुचाकीने पाळधी येथे वसुलीसाठी निघाले. दरम्यान बांभोरी गावाजवळी बसस्थानकाजवळून जात असतांन अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात शाहिद बागवान हा जागीच ठार झाला तर सोबत असलेला मित्र हा जखमी झाला आहे.

जखमी शहरातील खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. शाहिदचा मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. आज सोमवारी ७ जून रोजी सकाळी ९ वाजता शवविच्छेदन करण्यात आला असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील प्राथमिक तपास मनोज इंद्रेकर करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now