जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जुलै २०२२ । दुचाकी चोरी प्रकरणी दाखल गुन्ह्यातील तिघा संशयितांना मुक्ताईनगर येथून एलसीबी पथकाने अटक केली आहे. त्यांच्या कब्जातून चोरीच्या दोन मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.
राजीत फरान खाटीक (19) रा. सिटफॉर्म इदगाह नगर, मुक्ताईनगर, नवाब युसूफ शहा (20) रा. प्रतिभा नगर, वरणगाव व सलमान खान हमीद खान (28) रा.जुने गाव चांभार कॉलनी मागे, मुक्ताईनगर अशी अटकेतील तिघा चोरट्यांची नावे आहेत. चोरीच्या दोन मोटार सायकलींपैकी एक मोटार सायकल मुक्ताईनगर पोलिस स्टेशन हद्दीतून व दुसरी इच्छापूर ता. बुरहानपुर मध्य प्रदेश येथून चोरी केल्याचे दोघांनी कबुल केले आहे. दोन्ही ठिकाणी दाखल असलेले मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. पुढील तपासकामी दोघा गुन्हेगारांना मुक्ताईनगर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.