जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२२ । येथील टॉवर चौकातील जिल्हा काँग्रेस भवनासमोरून तरूणाची दुचाकी अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना उघडकीस आली असून या बाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, निलेश जीवन भाट (वय-३०) रा. कंजरवाडा, सिंधी कॉलनी, हा १४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास शहरातील टॉवर चौकात दुचाकी (एमएच १९ बीझेड ३७१५) ने आले. त्यांनी दुचाकी काँग्रेस भवन समोर उभी करून बाजारात खरेदीसाठी निघून गेले. अज्ञात चोरट्यांनी १५ हजार रुपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. निलेश भाट याने दुचाकीचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही. अखेर मंगळवार दि १९ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन या बाबत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पो.ना. राजकुमार चव्हाण हे करीत आहेत.