गुन्हेभुसावळ

वडिलांची ती भेट ठरली अखेरची…अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ०२ नोव्हेंबर २०२१ । भुसावळ ते जळगावदरम्यानच्या महामार्गावरील अपघाताचे प्रमाण आता वाढताना दिसून येत आहे. अशातच आजारी वडिलांची भेट घेऊन परतणाऱ्या तरुणाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रात्री नशिराबाद टोलनाक्या नजीक घडली. मयूर अरुण चौधरी (वय २८, रा. नशिराबाद) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी पंचनामा केला.

याबाबत असे की, मयूर रेमंड वस्त्रोद्योग कंपनीत कामाला होता. चौधरी कुटंुबीय शिवपूर कन्हाळा (ता. भुसावळ) येथील मूळ रहिवासी आहे. नोकरीच्या निमित्ताने मयूर हा आई-भावासह दोन वर्षांपूर्वी नशिराबाद येथे स्थलांतरित झाला आहे. त्याचे वडील अरुण अमृत चौधरी वृद्धापकाळाने सतत आजारी असतात. ते शिवपूर-कन्हाळा येथे राहतात. सोमवारी सुटी टाकून मयूर वडिलांची भेट घेण्यासाठी दुचाकीने (एमएच १९ डीजी ५५७५) मूळगावी गेला होता. वडिलांची भेट घेतल्यावर रात्री घराकडे पतत असताना आठ वाजेच्या सुमारास भुसावळ-जळगाव राेडवरील ओरिएंट सिमेंट कंपनीसमाेर त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली.

अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर नशिराबाद पेालिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृत मयूर व अपघातग्रस्त दुचाकीचे फोटो व्हायरल केले. नशिराबादचे माजी सरपंच विकास पाटील यांनी त्याची ओळख पटवली. मयूरच्या मामांसह कुटुंबीयांना कळवल्यावर ते शासकीय रुग्णालयात दाखल झाले. याबाबत एमआयडीसी पोलिसांनी पंचनामा केला. आज शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांना सोपवण्यात येईल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button