दुचाकी ट्रकवर आदळली, तरुण ठार

जुलै 6, 2022 11:02 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जुलै २०२२ । ट्रक चालकाने अचानक ब्रेक लावल्याने मागून येणारी दुचाकी ट्रॅकवर आदळली. यात दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना दि. ४ जुलै रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास एरंडोल म्हसावद रस्त्यावर ग्रामीण रुग्णालया जवळ घडली. याबाबत मंगळवारी एरंडोल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

accident erandol jpg webp

एरंडोल म्हसावद रस्त्यावर ग्रामीण रुग्णालया जवळ (एम.एच.१५.जीव्ही ३५९७) क्रंमाकाचा ट्रक चालकाने अचानक ब्रेक लावल्यामुळे चंपालाल काजर्या पावरा (भोसले) वय ३३ (एम.एच.१९ ऐडबल्यु ३५५९) हिने मागून ट्रकला धडक दिली. त्यात चंपालाल हा जागीच ठार झाला. मृत चंपालाल हा मूळ राजपुरा तालुका पानसेमल ( मध्य प्रदेश ) ह.मुक्काम दुसखेडा ता. पाचोरा येथे कामाला होता.

याबाबत एरंडोल पो. स्टे.ला भाग ५ भा.द.वी. कलम ३०४ ( अ ), २७९,४२७ मो.वा. कायदा कलम १८४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. हेड काँ. सुनील लोहार , मिलिंद कुमावत, अकील मुजावर हे पुढील तपास करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now