जळगाव लाईव्ह न्यूज । १६ सप्टेंबर २०२१ । देशात कमी होत असलेली कोरोना रुग्णांची संख्या आणि वाढणारी रेल्वेने प्रवाशांची संख्या लक्षात घेता अनेक मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनातर्फे २ अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. भुसावळ विभागातून धावणाऱ्या गाड्यात साईनगर शिर्डी ते हावडा ते एलटीटी-हटिया अशा या दोन विशेष गाड्याचा समावेश आहे.
साईनगर शिर्डी ते हावडा दरम्यान ०२५९३ क्रमांकाची साप्ताहिक विशेष गाडी चालवण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे. ९ ऑक्टोबर ते १ जानेवारी २०२२ पर्यंत ही गाडी चालेल. तर ०२५९४ हावडा-साईनगर शिर्डी ही साप्ताहिक गाडी ७ ऑक्टोबर ते ३० डिसेंबरपर्यंत चालवण्यात येईल. यासोबतच एलटीटी-हटिया द्वि साप्ताहिक गाडी सुरु केली आहे. ०२८११ एलटीटी-हटिया गाडी ३ ऑक्टोबर ते २ जानेवारी २०२२ आणि ०२८१२ हटिया-एलटीटी गाडी १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबरपर्यंत धावेल. प्रवाशांनी कोरोनाचे नियम पाळून या गाड्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे विभागाने केले आहे.