मुंबईतील महामेगाब्लॉक भुसावळमार्गे धावणाऱ्या या गाड्या रद्द
जळगाव लाईव्ह न्यूज । १ जून २०२४ । मुंबईमधील महामेगाब्लॉक यामुळे ७२ मेल व एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या असून, भुसावळ व जळगाव स्थानकावरून जाणारी नागपूर दुरांतो, अमरावती एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहे, तर अनेक गाड्या दादर स्थानकापर्यंत केल्या आहे.
मुंबई येथील शिवाजी महाराज टर्मिनल व ठाणे रेल्वे स्थानकातील फलाटाची लांबी वाढविण्याच्या कामासाठी मध्य रेल्वेने ३१ मे ते २ जून दुपारी साडेतीन वाजेपर्यंत महामेगाब्लॉक घेतला आहे. ७२ मेल व एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यात भुसावळ, जळगाव स्थानकांवर थांबा असलेली नागपूर दुरांतो, अमरावती एक्स्प्रेस या अप व डाऊनच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
याचा फारसा परिणाम होणार नसल्याची माहिती जळगाव रेल्वेस्थानकावरील अधिकाऱ्यांनी दिली. मात्र, या गाड्या रद्द करण्यात आल्याने अनेकांना आपल्या प्रवासाचे फेरनियोजन करावे लागले आहे. यामुळे खासगी ट्रॅव्हल्स आणि एसटी बसला गर्दी वाढली आहे.
दादरपर्यंतच जाणार गाड्या
मध्य रेल्वेच्या महामेगाब्लॉकमध्ये भुसावळ विभागातून दिल्ली तसेच नागपूर मार्गे येणाऱ्या अनेक गाड्या मुंबई येथील दादर रेल्वे स्टेशनपर्यंत केल्या आहे. त्यामुळे भुसावळ मार्गावरून येणाऱ्या गाड्यांचे रद्द होण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे दादरपर्यंत प्रवासी जात असून, अन्य वाहतूक सेवा प्रवाशांना उपलब्ध आहे.
सध्या मुंबईकडे जाणारी गर्दी कमी
उन्हाळी सुट्यांच्या सुरुवातीलाच मुंबईकडे जाणारे व तिकडून येणाऱ्या प्रवाशांचा मोठ्या संख्येने प्रवास झाला आहे. त्यामुळे भुसावळ विभागातील
स्थानकावरून प्रभाव प्रवासी संख्या कमी आहे. त्यामुळे महामेगाब्लॉकमुळे फारसा परिणाम खान्देशातील प्रवाशांवर होणार नाही, असा दावा केला जात आहे