⁠ 
गुरूवार, मे 23, 2024

भैरवी वाघ-पलांडेंची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑगस्ट २०२३ । भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हा दूध संघाच्या माजी संचालिका भैरवी वाघ-पलांडे यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाली. भैरवी या माजी आमदार तथा भाजप प्रदेश उपाध्यक्ष स्मिता वाघ व (स्व.) उदय वाघ यांच्या कन्या असून, पुणे येथील जयश्री व अ‍ॅड. अशोकराव पलांडे यांच्या स्नूषा आहेत.

आर्किटेक्ट भैरवी यांनी महाविद्यालयीन काळात जळगाव येथे ‘अभाविप’च्या माध्यमातून शैक्षणिक चळवळीत सक्रिय सहभाग घेतला आहे. भारतीय जनता युवा मोर्चामधील महत्त्वपूर्ण कार्यामुळे त्यांच्याकडे पुणे महानगर उपाध्यक्षपदाची जबाबदारी होती. त्यानंतर त्यांच्यावर प्रदेश सचिव म्हणून जवाबदारी देण्यात आली होती. पक्ष संघटनेत त्यांची कारकीर्द अधिकच उज्ज्वल राहिल्याने त्यांच्यावर प्रदेश उपाध्यक्ष म्हणून मोठी जवाबदारी देण्यात आली आहे.

त्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, रावेर खासदार रक्षा खडसे, आमदार सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, संजय सावकारे, विभाग संघटन मंत्री रवी अनासपुरे, जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष जळकेकर महाराज, जळगाव पूर्व जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, महानगर अध्यक्ष उज्ज्वला बेंडाळे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.