मध्य रेल्वेचा पुन्हा ब्लॉक, ५ व ६ फेब्रुवारीला भुसावळ विभागातून धावणाऱ्या ‘या’ गाड्या रद्द
जळगाव लाईव्ह न्यूज । २ फेब्रुवारी २०२२ । रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. कारण मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात पाचवी आणि सहावी रेल्वे लाईन टाकण्याच्या कामासाठी ठाणे ते दिवा स्टेशनदरम्यान विशेष ७२ तासांचा मेगा पाॅवरब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे ५ आणि ६ फेब्रुवारी असे दोन दिवस भुसावळ विभागातून धावणाऱ्या दोन गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान असलेल्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम सुरू यासाठी पुन्हा पुन्हा एकदा 72 तासांचा मेगा ब्लॉक (Mega block) घेण्यात येणार आहे. त्यामुळे दिनांक 5 , 6 आणि 7 फेब्रुवारी रोजी हा ब्लॉक घेतला जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वतीने देण्यात आली आहे.
दरम्यान, ५ आणि ६ फेब्रुवारी असे दोन दिवस भुसावळ विभागातून धावणारी १२१११ / १२११२ मुंबई-अमरावती व १२१४० / १२१४० नागपूर मुंबई सेवाग्राम या गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. तर मनमाडमार्गे धावणाऱ्या १२०७१ मुंबई-जालना जनशताब्दी, १२०७२ जालना- मुंबई, १२१०९ मुंबई -मनमाड पंचवटी, १२११० मनमाड -मुंबई पंचवटी, १७६११ नांदेड- मुंबई राज्यराणी, १७६१० मुंबई -नांदेड राज्यराणी.. रेल्वे प्रशासनाने पत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
हे देखील वाचा :
- गोदावरी अभियांत्रिकीत स्वावलंबी भारत अभियानार्तंगत उद्यमिता संमेलन उत्साहात
- जळगावात आणखी एक अपघात; ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार
- जळगाव शहरातील महामार्गावर पुन्हा अपघात; दुचाकीस्वार वृद्धाला अज्ञात वाहनाने चिरडले
- Jalgaon : दुचाकी लांबविणारे दोघे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात
- रेल्वेत 10वी पाससाठी नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल 4000 पेक्षा जास्त जागांसाठी भरती, इतका पगार मिळेल?