जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२२ । भुसावळमार्गे गुजरातकडे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. दक्षिण पूर्व रेल्वे खरगपूर रेल्वे विभागाच्या खरगपूर रेल्वे स्थानकाला तिसरी लाईन जोडण्याचे काम केले जाणार आहे. यासाठी 21 आणि 22 मे 2022 रोजी ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे भुसावळ विभागातून धावणाऱ्या हावडा अहमदाबाद एक्सप्रेससह संत्रागाछी-पोरबंदर एक्स्प्रेस रद्द करण्यात आलेली आहे.
हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेस ही सर्वात जास्त गर्दी असलेल्या ट्रेनपैकी एक आहे. रेल्वेने वेगवेगळ्या तारखांना हावडा अहमदाबाद एक्सप्रेससह चार गाड्या रद्द केल्या आहेत. याशिवाय ३ गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. 21 ते 23 मे या कालावधीत या गाड्यांवर परिणाम होणार आहे. दरम्यान, उन्हाळी सुट्ट्यांमध्ये वारंवार गाड्या रद्द होत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.
रद्द केलेल्या गाड्या
21 मे 2022 रोजी अहमदाबादहून धावणारी 12833 अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेस रद्द राहील.
22 मे 2022 रोजी हावडा येथून धावणारी 12834 हावडा-अहमदाबाद एक्सप्रेस रद्द राहील.
20 मे 2022 रोजी पोरबंदर – पोरबंदरहून 12949 धावणारी संत्रागाछी एक्स्प्रेस रद्द राहील.
22 मे 2022 12950 संत्रागाछी-पोरबंदर एक्स्प्रेस संत्रागाछीहून धावणारी रद्द राहील.