⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 12, 2024
Home | गुन्हे | बाबो..! चोरीच्या 34 दुचाकीसह दोन चोरटे बोदवड पोलिसांच्या जाळ्यात

बाबो..! चोरीच्या 34 दुचाकीसह दोन चोरटे बोदवड पोलिसांच्या जाळ्यात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जुलै २०२४ । जिल्ह्यात दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून याच दरम्यान बोदवड पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून तब्बल चोरीच्या ३४ दुचाकी हस्तगत करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली. जितेंद्र उर्फ दगडू नारायण सोनवणे (वय-३१, रा. भुसावळ) व रुपेश ज्ञानेश्वर चौधरी (रा. सिद्धेश्वर नगर, वरणगाव) असे दोन्ही चोरट्यांचे नाव असून याबाबत बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि १९ जून रोजी बोदवड शहरातील विजय पुंडलिक माळी यांची दुचाकी क्रमांक (एमएच १९ सीए ५१८७) ही चोरी गेली होती. त्यानुसार बोदवड पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या गुन्ह्याचा तपास सुरू असताना ही दुचाकी भुसावळ शहरातील जितेंद्र उर्फ दगडू नारायण सोनवणे वय-३१ याने चोरी केल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार बोदवड पोलिसांनी जितेंद्र सोनवणे याला अटक केली. त्याला विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता, त्याने ही चोरी त्याचा सहकारी रुपेश ज्ञानेश्वर चौधरी रा. सिद्धेश्वर नगर, वरणगाव ता. भुसावळ यांच्यासोबत केल्याचे कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी रुपेश चौधरी याला वरणगाव शहरातून अटक केली. दरम्यान दोघांची कसुन चौकशी केली असता त्यांनी जळगाव जिल्ह्यातील बोदवड, मुक्ताईनगर, वरणगाव तसेच बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा आणि मलकापूर या भागात जाऊन त्यांनी दुचाकी चोरी केल्याचे सांगितले. दरम्यान पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल चोरीच्या ३४ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. याप्रकरणी बोदवड पोलीसात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.