Jalgaon : चोरीच्या 24 दुचाकींसह दोन सराईत चोर जेरबंद

नोव्हेंबर 11, 2025 12:51 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून अशातच अमळनेर शहरासह विविध ठिकाणी मोटारसायकली चोरणाऱ्या शहादा तालुक्यातील दोघांना अमळनेर पोलिसांनी शिताफीने अटक करून त्यांच्याकडून १५ लाख ६३ हजार रुपयांच्या २४ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या कामगिरीसाठी अमळनेर पोलिसांना विशेष बक्षीस देण्यात येत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

arrested

अमळनेर शहरासह विविध ठिकाणाहून दररोज दुचाकी चोरीस जात होत्या. पोलिस पथकाने विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून आरोपी निष्पन्न केले. हे दोन्ही आरोपी हिम्मत रेहंज्या पावरा, अंबालाल भुरट्या खर्डे रा. सातपिंप्री ता. शहादा येथील असल्याचे समजले

आरोपी जंगलातून विविध ठिकाणी जात असल्याने पोलिसांना खूप पायपीट करावी लागली मात्र पोलिसांनी माहितीच्या आधारे त्यांचा पाठलाग करून त्यांना धडगाव येथून ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांना खाक्या दाखवताच त्यांनी विविध ठिकाणाहून १५ लाख ६३ हजार रुपयांच्या २४ मोटारसायकली चोरल्या आणि विविध लोकांना विकल्याची कबुली दिली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now