---Advertisement---
गुन्हे चोपडा

Breaking : ४ गावठी पिस्तूल, १० काडतूस बाळगणारी श्रीरामपूरची टोळी एलसीबीने पकडली

---Advertisement---

Chopda NEws-जळगाव लाईव्ह न्यूज । १४ नोव्हेंबर २०२२ । जळगाव जिल्ह्यात इतर जिल्ह्यातून येत गावठी कट्टे विक्री करणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. रविवारी एलसीबीचे निरीक्षक किसनराव नजन पाटील यांना मिळालेल्या माहितीवरून चोपडा येथे सापळा रचून पथकाने दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील दोघांकडून चार गावठी पिस्तूलसह दहा जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले आहे. पदभार स्वीकारल्यानंतर किसनराव नजन पाटील यांची ही मोठी कारवाई मानली जात आहे.

jalgaon 2022 11 14T135232.172

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना काही संशयीत चोपडा येथे गावठी कट्टा खरेदीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिले होते. पथकाने रविवार, 13 नोव्हेंबर रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास शिवाजी चौकात सापळा रचला. संशयीत कार आल्यानंतर तिची झडती घेतल्यानंतर त्यातून चार गावठी पिस्टल व 10 जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. पथकाने राजेंद्र ऊर्फ पप्पू भिमा चव्हाण (32, रा. खंडाळा, ता.श्रीरामपूर, जि.अहमदनगर), गणेश ज्ञानेश्वर सातपुते (23, रा.शिरसगाव, ता.श्रीरामपूर, जि.अहमदनगर) यांना अटक करण्यात आली तर अंधाराचा फायदा घेत बबन उर्फ रोहित जाधव (रा.शिरसगाव, ता.श्रीरामपूर, जि.अहमदनर) पसार झाला.

---Advertisement---

या संदर्भात स्थानिक गुन्हे शाखेचे दीपककुमार शिंदे यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलिसात भारतीय हत्यार कायदा कलम 3/25सह भादवि कलम 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, गुन्हा दाखल झालेल्या तिघांविरोधात श्रीरामपुर तालुक्यात अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.

यांनी केली कारवाई
जिल्ह्यात अग्निशस्त्र बाळगणान्यावर कारवाई करण्याबाबत एम. राज कुमार, पोलीस अधीक्षक जळगाव, चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव, रमेश चोपडे, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव, ऋषिकेश राऊले, सहा. पोलीस अधीक्षक, चोपडा उपविभाग, चोपडा यांनी किसन नजन पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना सूचना व मार्गदर्शन केले. त्यानुसार त्यांनी त्यांचे अधिनस्त पोलोस अंमलदार पोउनि, अमोल देवढे, पोहेकॉ / सुनिल पंडीत दामोदरे, पोहेकॉ महेश आत्माराम महाजन, पोना/ रविंद्र रमेश पाटील, पोना / परेश प्रकाश महाजन, पोकों/दिपककुमार फुलचंद शिंदे, चापोकों/मुरलीधर सखाराम बारी यांनी सदर कारवाई केली.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---