यावल शहरातील दोन जण जिल्ह्यातून हद्दपार

ऑक्टोबर 25, 2024 3:27 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या आदेशावरून यावल येथील दोन तरुणांना सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले. या कारवाईमुळे यावल शहरातील अन्य गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये खळबळ उडाली आहे.

crime 2 jpg webp

जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या आदेशान्वये पोलिस निरीक्षक यावल प्रदीप ठाकूर यांनी आपल्या पोलिस ठाण्यांतर्गत दोन सराईत गुन्हेगारांचा हद्दपारीचा प्रस्ताव दिला होता. त्याला मंजूरी देत यावल शहरातील कुणाल सतीश गजरे (रा. सिद्धार्थ नगर) व गौरव सदानंद गजरे (रा.सिद्धार्थ नगर) यांना सहा महिन्यासाठी जिल्ह्याचे हद्दीतून हद्दपार करण्यात आले आहे.

कुणाल गजरे याची शिवाजीनगर मधुकर मार्ग एलफिस्टन रोड मुंबई येथील त्यांच्या सख्ख्या बहिणीकडे तर गौरव गजरे यास त्यांच्या आत्या गुजरात हाऊसिंग बोर्ड कटवाडा, अहमदाबाद यांच्याकडे सोडण्याचे आदेश देण्यात आले. निरीक्षक ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सोपान गोरे, सहाय्यक फौजदार असलम खान, हवालदार वासुदेव मराठे, सुनील पाटील, पोलिस नाईक वसीम तडवी यांनी पुढील कारवाई केली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now