घरकुलाच्या दुसरा हप्त्यासाठी मागितली १० हजाराची लाच; कंत्राटी अभियंत्यासह खासगी इसमावर गुन्हा दाखल

डिसेंबर 4, 2025 10:56 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । घरकुलाच्या रकमेचा दुसरा हप्ता देण्यासाठी दहा हजाराच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी धरणगाव पंचायत समितीच्या कंत्राटी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता गणेश संभाजी पाटील (३१) यांच्यासह खासगी इसम सागर शांताराम कोळी (३०, रा. निंभोरा, ता. धरणगाव) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

lach jpg webp

काय आहे प्रकार?

तक्रारदाराला २०२४-२५ या वर्षात पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत घरकूल मंजूर झाले असून पहिल्या हप्त्यापोटी फेब्रुवारी २०२५ मिळाला, घरकुलाचा दुसरा हप्ता बँक खात्यावर जमा झाला नाही म्हणून त्यांनी धरणगाव पंचायत समितीत जाऊन घरकुलासंदर्भात काम करणारे कंत्राटी अभियंता गणेश पाटील यांच्याकडे चौकशी केली.

मात्र, कंत्राटी अभियंता गणेश पाटील यांनी सध्या निधी नसल्याचे सांगितले. दुसरीकडे, तक्रारदाराला गावातील लोकांकडून घरकुलाचा दुसरा हप्ता बँकेत जमा झाल्याची माहिती मिळाली. त्यामुळे तक्रारदाराने आठ जुलै रोजी सकाळी अकराच्या सुमारास धरणगाव पंचायत समितीत जाऊन संबंधित कंत्राटी अभियंता पाटील यांची भेट घेऊन घरकुलाच्या दुसऱ्या हप्त्याबाबत विचारणा केली. तेव्हा अभियंता पाटील यांनी घरकुलाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी तक्रारदाराकडे १० हजार रूपयांची मागणी केली. परंतु, तक्रारदार लाभार्थींने जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे १४ जुलै रोजी तक्रार दाखल केली.

तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंचासमक्ष पडताळणी केली असता, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता गणेश पाटील यांनी तक्रादाराकडे घरकुलाच्या दुसऱ्या हप्त्याची रक्कम बँक खात्यावर जमा करण्याच्या मोबदल्यात १० रूपयांच्या लाचेची मागणी केली. तसेच खासगी इसम सागर कोळी याच्या भ्रमणध्वनीवरून १६ जुलै रोजी लाच स्वीकारण्याची तयारी व सहमती दर्शवली. एकूण सर्व प्रकरणाची खात्री झाल्यानंतर बुधवारी गणेश पाटील आणि सागर कोळी यांच्या विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now