⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | पाचोरा | पाचोरा-भडगाव ग्रामीण रुग्णालयात दोन ऑक्सिजन प्रकल्प उभारणार

पाचोरा-भडगाव ग्रामीण रुग्णालयात दोन ऑक्सिजन प्रकल्प उभारणार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ एप्रिल २०२१ । जिल्ह्यात वाढलेल्या कोरोना संसर्गामुळे कोरोना रुग्णांची व भविष्यातील दुरोगामी आरोग्य उपाययोजना म्हणून पाचोरा – भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून पाचोरा व भडगाव ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन (प्राणवायू) प्रकल्प उभारणी व रेमेडिसिव्हर इंजेक्शन खरेदी कामी १ कोटी रुपायांच्या निधीची तरतूद केली असून आगामी येत्या १५ दिवसात हे प्रकल्प (प्लांट) कार्यान्वित होतील अशी आशा व्यक्त होत आहे. 

दरम्यान या प्रकल्प उभारणी करीता अधिकाऱ्यांसमवेत आ. किशोर पाटील यांनी पाचोरा येथील गोराडखेडा रोड लगत नियोजित ट्रामा केअर सेंटर व पाचोरा रुग्णालया शेजारील जागेची पाहणी केली आहे. या नियोजित प्रकल्पात  दिवसाला पाचोरा तालुक्यात ७८ व भडगाव प्रकल्पात ७८ सिलेंडर ऑक्सिजनची निर्मिती होणार असून पाचोरा तालुक्यासाठी चा हा प्रकल्प ग्रामीण रुग्णालया शेजारील जागेवर करण्याचे निश्चित करण्यात आले. तर भडगाव तालुक्यासाठी हा प्रकल्प  ग्रामीण रुग्णालया लगत उभारण्यात येणार आहे.

पाचोरा व भडगाव ला रस्ते वाहतूक मार्गे जळगाव वा इतर ठिकाणाहून ऑक्सिजन पोहचतो यात अनेकदा अडचणी येतात म्हणून मतदार संघातील रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये यासाठी आमदार किशोर पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून पाचोऱ्यासाठी ५० लक्ष व भडगाव साठी जिल्हा नियोजन मंडळाकडून ५० लक्ष रुपयांची मागणी केली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजनची सर्वत्र मागणी वाढली आहे.

त्यामुळे आरोग्य यंत्रणेला मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याबाबीची गंभीर दखल आमदार किशोर पाटील यांनी  सुरुवाती पासून घेत अनेक उपाय योजना केल्या आहेत. पाचोरा शहरात भडगाव सह शेजारील जामनेर, सोयगाव, शेंदूरणी, पहूर,  तिडके, आदी भागातील रुग्ण मोठ्या प्रमाणावर उपचारासाठी दाखल होत असतात. त्यामुळे आरोग्य सेवा अधिक ताण पडत असतो.

दरम्यान जागेची पाहणी प्रसंगी  नगराध्यक्ष संजय गोहिल, उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील, तहसिलदार कैलास चावडे, तालुका वैद्यकिय अधिकरी डॉ. समाधान वाघ, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित साळुंखे, अबूलेस शेख, शहर प्रमुख किशोर बारावकर, स्वीय सहाय्यक राजेश पाटील, भरत खंडेलवाल, यांची उपस्थिती होती. पाचोरा ग्रामीण रुग्णालयाकरिता ४०० रेमेडिसिव्हर, भडगाव ग्रामीण रुग्णालयासाठी २५० इंजेक्शन व पाचोरा – भडगाव तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्यकी ५० इंजेक्शनची खरेदी केली जाणार आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.