⁠ 
रविवार, ऑक्टोबर 6, 2024
Home | गुन्हे | क्लिक करताच शिक्षिकेच्या खात्यातून पावणेदोन लाख साफ

क्लिक करताच शिक्षिकेच्या खात्यातून पावणेदोन लाख साफ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ सप्टेंबर २०२४ । मोबाईलवर आलेल्या एका फाईलला क्लिक करताच मोबाईल हॅक होऊन शिक्षिकेच्या खात्यातून एक लाख ७२ हजार ८९० रुपये परस्पर दुसऱ्या खात्यात वळविण्यात येऊन फसवणूक करण्यात आली. हा प्रकार ३ सप्टेंबर रोजी घडला, रक्कम गोठविण्यात येऊन ती परत मिळेल या प्रतीक्षेत असताना कोणतीही रक्कम न मिळाल्याने शनिपेठ पोलिस ठाण्यात देण्यात आलेल्या फिर्यादीवरून अज्ञात तीन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. योगेश्वर नगरातील रहिवासी स्वप्ना खुशबू पाटील (३८) या एका शाळेत शिक्षिका आहे. ३ सप्टेंबर रोजी त्यांना एका क्रमांकावरून कॉल आला व तुमचे क्रेडीट कार्ड बंद न केल्यास दोन हजार ५०० रुपये भरावे लागतील, असे त्यांना सांगण्यात आले.

त्यामुळे शिक्षिकेने कॉल कट केला. त्यानंतर या शिक्षिकेच्या मोबाईलवर एका अनोळखी क्रमांकावरून एक फाईल आली. तिला क्लिक करताच शिक्षिकेचा मोबाईल हॅक झाला व त्याचा अॅक्सेस दुसऱ्या मोबाईलवर गेला व पैसे वळते झाले. बँकेत तक्रार केल्याने १२० दिवसात तपास करू, असे त्यांना सांगण्यात आले. ही रक्कम गोठविण्यात येऊन परत मिळेल, अशी अपेक्षा शिक्षिकेला होती. मात्र कोणतीच रक्कम्म गोठविण्यात आली नसल्याचे त्यांना समजले. त्यांनी शनिपेठ पोलिसात फिर्याद दिली. अज्ञात तीन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे करीत आहेत.

एक लाख वळविल्याने वाचले
मोबाईलवर येत असलेले ओटीपी दुसऱ्या क्रमांकावर जात असल्याचे शिक्षिकेच्या लक्षात आल्याने त्यांनी त्यांच्या बँक खात्यातील एक लाख रुपये दुसऱ्या बँक खात्यावर पाठविले. त्यामुळे ही रक्कम वाचली. मात्र पहिल्या खात्यावरून एक लाख १७ हजार रुपये दुसऱ्याच्या खात्यावर गेल्याचे त्यांना मेसेज आले. तसेच क्रेडीट कार्डवरून ५४ हजार ८९० रुपये वळविल्याचेही लक्षात आले

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.