⁠ 
बुधवार, नोव्हेंबर 6, 2024
Home | गुन्हे | दोन जळगावकरांना कोट्यवधी रुपयांचा ऑनलाईन गंडा; तुमचीही होवू शकते फसवणूक, अशी घ्या काळजी

दोन जळगावकरांना कोट्यवधी रुपयांचा ऑनलाईन गंडा; तुमचीही होवू शकते फसवणूक, अशी घ्या काळजी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | १४ डिसेंबर २०२२ | जळगाव शहरात गेल्या आठवडाभरात दोन जणांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पहिल्या प्रकरणात फेसबुकवर पतंजली योगा प्रशिक्षणाच्या बनावट जाहिरातीच्या माध्यमातून धरणगावचे प्राचार्य डॉ. किशोर मंगेश पाटील यांची १ लाख १९ हजारांत फसवणूक झाली. या प्रकरणी धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसर्‍या एका प्रकरणात, संगणकाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या बनावट कंपनीच्या खोट्या इलेक्ट्रॉनिक्स रेकॉर्डच्या भुलभुलैय्याला बळी पडून जळगावचे व्यवसायिक वासुदेव महाजन यांची सुमारे दिड कोटी रुपयात फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑनलाईनच्या भुलभुलय्यात कशा प्रकारे फसवणूक केली जाते आणि आपण कशी काळजी घेतली पाहिजे, याची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार आता नवे राहिलेले नाहीत. याबाबत वृत्तपत्रांमध्ये दररोज वाचण्यात येत असले तरी अनेकजण ऑनलाईन फसवणुकीला बळी पडतात. यास अनेक कारणं आहेत. त्यातील मुख्य कारण म्हणजे, ऑनलाईन खरेदी! ऑनलाइन शॉपिंग करतांना पेमेंटसाठी ऑनलाईन मोडचा वापर केला जातो. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग आणि युपीआय या विविध पर्यायांचा वापर केला जातो. ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी सोशल मीडियांच्या खात्यांसह क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, युपीआय पिन नियमितपणे बदलत राहावे. फ्री वायफाय, सायबर कॅफेचा वापर करू नये या काळात तुमचे बँकिंग तपशील हॅक होण्याची जास्त शक्यता असते. सार्वजनिक सायबर कॅफेमध्ये जाऊन बँकिंगचे कोणतेही काम करू नये. इंटरनेट वापरून असुरक्षित वेबसाइट उघडू नये.

सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणूक
सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणूक केली जाते. या प्रकरात अनोळखी व्यक्ती सोशल मीडिया अकाऊंटवरून तुमच्याशी आधी मैत्री करतात. त्यानंतर काही भेटवस्तू पाठवण्याविषयी मेसेजेस करतात. यामध्ये मौल्यवान भेट वस्तू पाठवत आहोत. थोडे पैसे भरावे लागेल. त्यानंतर कस्टम ऑफिसर बनून फोन केला जातो आणि ते सांगतात की कस्टम ड्युटी भरा. मग तो तुम्हाला कस्टम ड्युटीच्या नावाने त्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करायला लावतात, शेवटी कळते की आपली फसवणूक झाली आहे. मात्र तेंव्हा आपल्या हाती काहीच उरत नाही.

‘फेसबुक पेज अ‍ॅड नेटवर्क’च्या माध्यमातून फसवणूक
ऑनलाईन फसवणूकीसाठी ‘फेसबुक पेज अ‍ॅड नेटवर्क’चा वापर मोठ्या प्रमाणात केला जावू लागला आहे. यात फसवणूक करणारे लोक, फेसबूक पेज किंवा प्रोफाइल तयार करतात. त्या माध्यमातून आपल्या उत्पादनांची ऑनलाइन विक्री सुरू करतात. फेसबुकवरील अशा जाहिरातीवर क्लिक केलं की, ग्राहक त्या संबंधित पोर्टलवर जातो. त्या ठिकाणी ऑर्डरसाठी पैसे भरल्यानंतर असे बनावट पोर्टल अचानक नाहीसं होतं. यासह मोठ्या ब्राण्डचे फेक टोल फ्री क्रमांक गुगलवर टाकले जातात. त्यावर कुणी संपर्क साधल्यानंतर त्याची फसवणूक करणे भामट्यांसा सोपे होते. यामुळे टोल फ्री क्रमांक गुगलवर न शोधता संबंधित कंपनीच्या अधिकृत वेबसाईवर जावूनच शोधावा.

WHO.IS चा वापर करा
ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी वापरकर्त्याने सर्वप्रथम ते चुकीच्या वेबसाइटचा वापर तर करत नाहीत ना, हे जाणून घेण्यासाठी सगळ्यात आधी वेबसाइटचं यूआरएल तपासून घ्या. कारण प्रत्येक वेबसाइट यूआरएल वेगवेगळं असतं. फेबसाइट फेक असेल तर त्यामध्ये एखाद-दुसरा शब्द जास्त किंवा कमी असण्याची शक्यता असते. यासाठी थकज.खड या वेबसाइटच्या माध्यमातून तुम्ही एखाद्या वेबसाइटच्या खरे-खोटेपणाची शहानिशा करू शकता. WHO.IS वर जाऊन संशयास्पद वेबसाइटचं नाव सर्च केल्यास त्या वेबसाइटची संपूर्ण माहिती समोर येते. इतकंच नव्हे, त्या वेबसाइटची नोंदणी कोणाच्या नावे झाली आहे, हे सुद्धा कळू शकते.

author avatar
डॉ. युवराज परदेशी
पत्रकारिता क्षेत्रात गत १८ वर्षांपासून कार्यरत. कॉर्पोरेट कम्युनिकेशन व लॉबिंग या विषयावर पीएच.डी.चे संशोधन. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. तीन पुस्तके प्रकाशित. दैनिक लोकसत्ता, दैनिक देशदूत मधील कामासह महाराष्ट्र विधीमंडळ वार्तांकनाचा दीर्घ अनुभव. दैनिक जनशक्तीचे माजी निवासी संपादक.