गुन्हेजळगाव जिल्हाजळगाव शहर

दोन सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी झाले स्थानबध्द

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जिल्हा प्रशासनाने दोन सराईत गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी स्थानबध्द करण्याचे निर्देश दिले आहेत.

जळगाव तालुक्यात अवैधरित्या हातभट्टीची दारु तयार करुन त्याची विक्री करण्याबाबतचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे वारंवार करणार्‍या जिभाऊ वसंत गायकवाड, ( वय ३४ वर्षे, रा. दापोरा, ता. जि. जळगाव) यांचेवर स्थानबध्द करण्याबाबतची कारवाई करण्यात आलेली आहे.

सन २०१५ पासून जळगाव जिल्ह्यातील यावल, चोपडा व जळगाव तालुकयातील तापी नदीपात्रातून विनापरवाना अवैधरित्या वाळूची वाहतूक करुन विक्री करीत असल्याने त्यांचेवर दाखल एकूण ०८ गुन्हे दाखल असल्याने ज्ञानेश्‍वर नामदेव तायडे उर्फ नाना कोळी, ( वय ३२ वर्षे, रा कोळन्हावी, ता यावल ) यांचेवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्याबाबत पोलीस अधिक्षक जळगाव यांनी प्रस्ताव सादर केला होता.

या प्रस्तावास जिल्हादंडाधिकारी जळगाव यांनी मंजूरी दिली. त्यानुसार स्थानबध्द करण्याबाबतची कारवाई करण्यात आलेली आहे. जळगाव जिल्ह्यात एमपीडीए कायद्यांतर्गत माहे नोव्हेंबर २०२२ पासून आजपावेतो गंभीर गुन्हे दाखल असलेले एकूण १९ गुन्हेगारांवर धोकादायक व्यक्ती, हातभट्टीवाले व वाळू तस्कर या नियमाखाली नागपूर, अमरावती, ठाणे, नाशिक, येरवडा या मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द करण्याबाबतची कारवाई जिल्हादंडाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

Related Articles

Back to top button