जळगाव लाईव्ह न्यूज । २६ डिसेंबर २०२१ । एरंडोल प्रतिनिधी । येथे संतोष लक्ष्मण महाजन वय-४९ वर्षे रा.हनुमान नगर,म्हसावद रोड एरंडोल यांनी निंबाच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली तर दुसर्या घटनेत सायसिंग वय-२९ वर्षे याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. या दोन्ही घटनांबाबत एरंडोल पोलिस स्टेशन ला अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे.
एरंडोल पोलिस स्टेशन सूञांकडून मिळालेली माहीती अशी की, संतोष लक्ष्मण महाजन यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ जवळील निसार मुजावर यांच्या शेतालगतच्या पडीक शेतात निंबाच्या झाडास गळफास घेऊन आपली जिवनयाञा संपवली. २६ डिसेंबर रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. त्यांस खाली उतरवून खाजगी वाहनाने एरंडोल ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता तपासणीअंती ते मृत घोषित करण्यात आले.
मृत संतोष महाजन हे रोलर चालक होते. त्यांच्या पश्चात २मूले,१मुलगी,जावई असा परीवार आहे. यांच्या अंगावरील जँकेट च्या खिशात सुसाईड नोट आढळुन आली असुन ती पोलिसांनी जप्त केली आहे.तीच्यात ३ते४ जणांच्या नावांचा उल्लेख असुन सदर नोट तपासकामी महत्वाचा दुवा ठरणार आहे. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल अनिल पाटील, संतोष चौधरी,मधुरा पवार हे पुढील तपास करीत आहेत.
सायसिंग रा.साहदर,जिल्हा खरगोन या युवकाने विषारी द्रव्य प्राशन केल्याने त्याचा मृत्यू झाला असावा असा पोलिसांचा प्राथमिक कयास आहे. सदर घटना कासोदा रस्त्यालगतच्या महेश काबरा यांच्या शेतात घडली. मृताच्या पँन्टच्या खिश्यात एक पाकीट मिळुन आले असता त्यात ३ आधार कार्ड मिळुन आले तसेच घटनास्थळी मिळालेला मोबाईल पोलिसांनी जप्त केला. प्रकाश भिका महाजन यांनी एरंडोल पोलीस स्टेशन ला खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा :