---Advertisement---
चोपडा

मोफत रक्तगट तपासणी शिबिराचा दोनशे जणांनी घेतला लाभ

---Advertisement---

नवरात्रोत्सव निमित्ताने सदगुरु मित्र मंडळातर्फे आयोजन

jalgaon 1

Dhanora News-जळगाव लाईव्ह न्यूज । अमोल महाजन । चोपडा तालुक्यातील धानोरा येथे नवरात्रोत्सव निमित्ताने रविवारी (ता.२) सद्गुरू मित्र मंडळ (गांधी चौक) यांच्यातर्फे मोफत रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात दोनशे जणांनी आपले रक्तगट तपासून घेतले. शिबिरात प्रामुख्याने विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन आपला रक्तगट तपासून घेतला.

---Advertisement---

सदगुरु मित्र मंडळातर्फे आयोजित मोफत रक्तगट तपासणी शिबिरात धानोरा येथील साई पॅथॉलॉजी लॅबचे डॉ. पन्नालाल महाजन व दिपमाला महाजन, मनीष पॅथॉलॉजी लॅबचे डॉ.गणेश महाजन यांनी रक्तगट तपासणी करून दिली. प्राथमिक आरोग्य केंद्र धानोरा येथीलवैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश कवडीवाले यांचे सहकार्य लाभले. सदगुरु मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शिबीर संपन्नतेसाठी परिश्रम घेतले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---