⁠ 
शुक्रवार, मे 17, 2024

झाड तोडण्यावरून मुंदखेड्यात दोन गट भिडले; २ गंभीर, गुन्हे दाखल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जानेवारी २०२२ । शेताच्या बांधावरील झाड तोडण्यावरून दोन गटात जबर हाणामारी झाल्याची घटना चाळीसगाव तालुक्यातील मुंदखेडे बुद्रुक येथे उघडीच आली आहे. यात कोयता, कुऱ्हाड, लोखंडी रॉड व लाकडी दांड्याचा वापर करण्यात आला. या हाणामारीत दोन्ही गटातील दोन जण गंभीर जखमी झाले असून दोन्ही गटांनी परस्परांविरोधात दिलेल्या तक्रारीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलिसात ७ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

मुंदखेडे बुद्रुक येथे २१ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास तक्रारदार सुधीर शिवाजी पाटील (वय ५७) हे शेतात जनावरांसाठी उसाचे ताेटे (टिपरे) वेचत हाेते. याचवेळी शेताच्या बांधावरील झाड तोडण्याच्या कारणावरून शेतात अनधिकृत प्रवेश करून सुधीर पाटील यांचा मुलगा महेश याने पकडून ठेवत कुऱ्हाड, लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने सुधीर पाटील यांच्या डाेक्यावर व हातावर मारहाण केली. तसेच जीवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. याप्रकरणी सुधीर पाटील यांच्या तक्रारीवरून मुंदखेडे बुद्रुक येथील जगदीश उर्फ नाना संजय पाटील, बंटी संजय पाटील, ऋषिकेश गोकुळ पाटील, एकनाथ भालचंद्र पाटील व मुकेश आत्माराम पाटील यांच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दाेन्ही घटनांचा तपास पोलिस उपनिरीक्षक लोकेश पवार करत आहेत.

डाेक्यावर कोयत्याने वार

दुसऱ्या गटाकडून जगदीश संजय पाटील (वय २२) यांनी पाेलिसांकडे तक्रार दिली आहे. २१ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास जगदीश पाटील यांनी त्यांच्या शेतातील लिंबाच्या तोडलेल्या झाडाची लाकडे ट्रॅक्टरमध्ये टाकत असलेल्या व्यक्तीला हे झाड कुणी तोडले असे विचारले. या वेळी महेश पाटील व सुधीर पाटील यांनी आम्ही झाड तोडले, तुझ्याने जे होईल ते करून घे, असे सांगत जगदीश पाटील व साक्षीदार ऋषभ पाटील यांना शिवीगाळ केली. तसेच जगदीश पाटील याच्या डाेक्यावर कोयत्याने वार केला. तसेच पाठीवर, पायावर मारहाण केली. तर ऋषभ पाटील हा यालाही लाकडी दांडक्याने मारहाण केली. याप्रकरणी महेश सुधीर पाटील, सुधीर शिवाजी पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे.

हे देखील वाचा :