ऊस तोड मजूर पुरविण्याचे सांगत जळगावच्या दोघांनी पुण्याच्या शेतकऱ्याला ६ लाखात गंडविले

जून 11, 2022 11:27 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जून २०२२ । ऊस तोड मजूर पुरविण्याचे सांगत शेतकऱ्याला ६ लाखात फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अडावद पोलिसांत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

crime 2022 06 11T112628.555

शेतकरी संभाजी विश्वनाथ पवार रा. गलांवाडी ता. दौड जि. पुणे, यांना आरोपी रामलाल किटकूल भिल व दीपक बुधा कोळी रा.चोपडा, यांनी ऊस तोड मजूर पुरविण्याचे सांगत. ६ लाख १० हजार रु. रोख मागून गावातून पसार झाले व फिर्यादीची फसवणूक केली. या प्रकरणी पवार यांनी अडावद पोलिसांत फिर्यादी दिली. त्यानुसार आरोपी रामलाल किटकूल भिल व दीपक बुधा कोळी रा.चोपडा, यांच्यावर फसवणूक केल्या प्रकरणी भा, कलम ४२०,४१७,४०६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. तपास जगदीश कोळंबे करीत आहे.

Advertisements

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now