⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

एशियन यूथ सॉफ्टबॉल स्पर्धेत जळगावच्या दोघांचा समावेश

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२२ । एशियन यूथ सॉफ्टबॉल कान फेडरेशनतर्फे एशियन यूथ सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धा ऑगस्टमध्ये आयोजित करण्यात अली आहे. सदर स्पर्धेत भारतीय मुलांचा संघ सहभागी होणार आहे. प्रातिनिधिक ३० खेळाडूंची निवड तीन कॅम्पमधून केली असून, त्यात महाराष्ट्राचे १० खेळाडू असून, या संघात जळगावच्या दोघांचा समावेश करण्यात आला आहे.

एशियन यूथ सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या १० खेळाडूंमध्ये जळगावच्या दोघांचा समावेश असून, यात धीरज बाविस्कर हा अँड. बाहेती महाविद्यालयाचा राष्ट्रीय खेळाडू आहे. तर गौरव चौधरी हा आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. हे दोघेही श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर नियमित सराव करतात. या निवडीबद्दल खेळाडूंचा आमदार गिरीश महाजन, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, पी. ई. पाटील, प्रशांत जगताप, डॉ. प्रदीप तळवेलकर, अरविंद राणे, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, डॉ. दिनेश पाटील, प्रा. संजय चौधरी, किशोर चौधरी, प्राचार्य अनिल लोहार, नगरसेवक नितीन बरडे, रोहन बाहेती यांनी गौरव केला.