---Advertisement---
जळगाव जिल्हा गुन्हे

भयंकर! ब्लॅकमेल करत चुलतभावासह दोन मित्रांनी केला विवाहित बहिणीवर अत्याचार

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जून २०२४ । बहीण भावाच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाच्या ठिकाणी कपडे बदलणाऱ्या चुलतबहिणीचे फोटो व व्हिडीओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत चुलतभावासह त्याच्या दोन मित्रांनी विवाहित बहिणीवर अत्याचार केले. हा धक्कादायक प्रकार ४ डिसेंबर २०२२ ते ६ जून २०२४ दरम्यान महिलेच्या घरी, जंगलात व धुळे जिल्ह्यात घडला. या त्रासाला कंटाळून महिलेने एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चुलतभावासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 1 jpg webp

एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात राहणारी २७ वर्षीय महिला नातेवाइकाकडे असलेल्या लग्नाच्या ठिकाणी गेली होती. त्या ठिकाणी ती कपडे बदलत असताना तिच्या चुलतभावाने तिचे फोटो काढण्यासह व्हिडिओदेखील तयार केला. त्यानंतर फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेच्या घरी चुलतभावाने अत्याचार केला.

---Advertisement---

त्यानंतर पुन्हा तिला वेगवेगळ्या ठिकाणी बोलवून अत्याचार करणे सुरूच ठेवले. त्याने अन्य दोन मित्रांनादेखील सोबत आणले व तिघांनी वेळोवेळी महिलेवर अत्याचार केला. हा प्रकार सहन न झाल्याने महिलेने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून रविवारी (२३ जून) चुलत भाऊ तसेच त्याचे दोन मित्र अशा एकूण तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि दत्तात्रय पोटे करीत आहेत

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---