खुशखबर! रावेर आणि बोदवड स्थानकांवर या दोन एक्स्प्रेसला मिळाला थांबा

ऑगस्ट 13, 2025 4:47 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑगस्ट २०२५ । भुसावळ विभागातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे भुसावळ रेल्वे विभागातील रावेरसह वरणगाव, बोदवड, निंभोरा, मलकापूर आणि नांदुरा या स्थानकांवर लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा देण्याची मागणी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केली होती.

bd rv

रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्री रक्षा खडसे यांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत रावेरसह बोदवड स्थानकांवर दोन रेल्वे गाड्यांना थांबा मजूर केला आहे. पुणे-दानापूर एक्स्प्रेसला रावेर येथे तसेच अमरावती-सुरत एक्स्प्रेसला बोदवड येथे थांबा मंजूर केला आहे. त्यासंदर्भात केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी माहिती दिली आहे. यामुळे स्थानिक प्रवाशांची गैरसोय दूर होऊ शकणार आहे.

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी १२१५० दानापूर-पुणे एक्स्प्रेसला रावेर येथे, १२६५६/१२६५५ नवजीवन एक्स्प्रेसला बोदवड येथे, २२१७७/२२१७८ महानगरी एक्स्प्रेसला रावेर येथे, ११०५७/११०५८ अमृतसर-मुंबई एक्स्प्रेसला निंभोरा येथे, १२११३/१२११४ गरीब रथ एक्स्प्रेसला मलकापुर येथे, १२७१९/१२७२० जयपुर-हैदराबाद आणि नागपूर-अहमदाबाद प्रेरणा एक्स्प्रेसला नांदुरा येथे, १२१२९/१२१३० आझाद हिंद आणि २०९२५/२०९२६ सूरत-अमरावती एक्सप्रेसला बोदवड येथे थांबा देण्याची मागणी रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांकडे निवेदनाद्वारे केली होती.

या गाड्यांचे थांबे मंजूर झाल्यास शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, नोकरदार, कामगार वर्ग आणि सामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. संपूर्ण परिसराचा सामाजिक व आर्थिक विकास साधला जाईल. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाकडून त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा मंत्री खडसे यांनी व्यक्त केली होती. प्रत्यक्षात, रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्री रक्षा खडसे यांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत पुणे-दानापूर एक्स्प्रेसला रावेर येथे तसेच अमरावती-सुरत एक्स्प्रेसला बोदवड येथे थांबा मंजूर केला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now