यावलात शेत विहिरीतून दोन विद्युत पंप नेले चोरून

मार्च 2, 2022 5:42 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । यावल येथील कालव्या लगत असलेल्या दोन शेतकऱ्यांच्या शेत विहिरीतून विद्युत पंप अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याचे समोर आले आहे. हा प्रकार मंगळवारी उघडकीस आला असून सुमारे ८० हजारा रूपये किंमतीचे हे विद्युत पंप होते. या प्रकरणी येथील पोलिसात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

yawal 1 jpg webp

शहरातील सतीष सुपडू यावलकर व गोपाळ कोळी यांचे जुना भालशिव रोडवर शेत आहे. या दोघ शेतकऱ्यांच्या शेत विहिरीवर पाण्याचा उपसा करण्यासाठी यावलकर यांच्या विहिरीत दहा तर कोळी यांच्या विहिरीत साडेसात अश्वशक्तीचे पंप किंमत सुमारे ८० हजार हे बसविण्यात आले होते. मंगळवारी शेतकरी शेतात गेले असता दोघ विहिरीतील विद्युत पंप अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी यावल पोलिसात सतीष यावलकर यांच्या फिर्यादी वरून अज्ञात चोरट्यांविरूध्द विद्युत पंप सह केबल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार असलम खान दिलावर खान करीत आहे.

शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

थेट शेत विहिरीतून विद्युत पंप चोरीस गेल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस ठाणे हद्दीत शेतात विहिरीवरील केबल चोरीच्या घटना वारंवार घडत असताना एकाच रात्रीत दोन ठिकाणी वीजपंप चोरीस गेल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now