गुन्हेजळगाव जिल्हा

Breaking : जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन लिपिक लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मार्च २०२४ । लाचखोरीची एक मोठी बातमी जळगावातून समोर आली आहे. ३० हजार रुपयांची मागणी करणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत विभागातील दोन लिपिकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहात अटक केली. महेश रमेशराव वानखेडे वय-३० आणि समाधान लोटन पवार वय-३५ असे लाचखोरांचे नाव असून या कारवाईने मोठी खळबळ उडाली.

नेमका प्रकार काय?
तक्रारदार हे जळगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आले होते. परंतु त्यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयात तीन अपत्य असल्याने संदर्भात एकाने तक्रारी अर्ज दाखल केला होता. दरम्यान ग्रामपंचायत विभागात कार्यरत असलेले महेश रमेशराव वानखेडे वय-३० आणि समाधान लोटन पवार वय-३५ या दोघांनी तक्रारदाराला तीन अपत्यबाबतचा चांगला अहवाल तयार करून देतो, त्यामुळे तुम्ही अपात्र होणार नाही, यासाठी ३० हजार रुपयांची लाचीची मागणी केली. दरम्यान तक्रार यांनी शनिवारी ९ मार्च रोजी लाचलुचपत विभागात तक्रार दिली. दरम्यान पथकाने सापळा रचून संशयित समाधान लोटन पवार हे ३० हजार पैकी २० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

यांनी केली कारवाई
यांनी केली कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस उपाधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एन.एन. जाधव, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, पोलीस नाईक बाळू मराठे, अमोल सूर्यवंशी, अमोल वालझाडे, सुरेश पाटील, रवींद्र घुगे, महिला पोलीस कॉन्स्टेबल शैला धनगर, किशोर महाजन, सुनील वानखेडे, प्रणेश ठाकूर,राकेश दुसाने प्रदीप पोळ यांनी सापळा यशस्वी केला

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button