जळगाव लाईव्ह न्यूज । तुषार देशमुख । चाळीसगाव येथे घरासमोर लावलेली दुचाकी चोरीप्रकरणी औरंगाबाद जिल्ह्यातील दोघा भामट्यांना चाळीसगाव शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि भगवान आबासाहेब पाटील(41) हे हिरापूर रोड वरील सुयश लॉन्स समोर राहतात. त्यांच्या मालकीची एम एच 19 डीएल 6820 ही होंडा कंपनीची मोटरसायकल दिनांक 5-7-21 रोजी राहत्या घरासमोर लावली असता 5 रोजी रात्री 10:30 ते 6 रोजी सकाळी 6:30 दरम्यान अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. बेपत्ता मोटरसायकलचा शोध घेऊनही मोटरसायकल मिळू न आल्यामुळे भगवान पाटील यांनी पोलिसात धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात इसमाचा विरोधात भादवि कलम 379, 411 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
या दुचाकी चोरीचा तपास पोलीस उपविभागीय अधिकारी कैलास गावडे शहर पोलीस निरीक्षक कांतीलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डीबीचे पोलीस नाईक राहुल सोनवणे, विजय पाटील, भूषण पाटील, विनोद खैरनार, व महिंद्र पाटील हे करीत असताना त्यांना ही दुचाकी चोरी कोणी केली याची गुप्त माहिती मिळाली.
शिताफीने तपास करून संशयित अमोल शंकर सोय (20) व नितीन विठ्ठल इंगळे राहणार सिल्लोड औरंगाबाद यांना 13 रोजी ताब्यात घेतले. दोघांकडून चोरीची मोटर सायकल देखील जप्त करण्यात आली. या गुन्ह्याचा तपास पोलिस नाईक राहुल सोनवणे करीत आहेत. या भामट्यांकडून अजूनही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.