⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

माजी सैनिक हत्येप्रकरणी दोन जण अटकेत

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ नोव्हेंबर २०२१ । मुक्ताईनगर तालुक्यातील वढोदा जवळील जंगलात लुटीच्या उद्देशाने दोघांना बोलावुन जबर मारहाणीत कोल्हापुर येथील माजी सैनिकाची हत्या व एक जण गंभीर झाल्याची दुर्देवी घटना ५ नोव्हेंबर रोजी घडली होती.

जखमी अनिल निकम यांच्या मित्रांनी नांदुरा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.दोन दिवसांपुर्वीच संबंधित गुन्ह्यांचा तपास मुक्ताईनगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला पोलीस उपविभागीय अधिकारी विवेक लावंड व पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी नांदुरा पोलीसांच्या मदतीने तपासाची चक्र वेगाने फिरवत तालुक्यातील हलखेडा येथील अजय दादाराव पवार व दादाराव हरबशी पवार यांना अटक केली असुन अन्य अज्ञात पाच-सहा आरोपी फरार असुन त्यांचा शोध सुरू आहे.

प्राथमिक चौकशीनंतर मांडुळ साप तस्करीचे प्रकरण समोर आले असुन सोशल मीडियाचाही गैरवापर झाल्याचे आढळुन आले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील सावर्डे बुद्रुक येथील अनिल आनंदा निकम व माजी सैनिक प्रल्हाद शिवराम तायडे यांना हलखेडा येथील पवार नावाच्या व्यक्तीने फसवणुकीच्या उद्देशाने मांडुळ सापाचे आमीष दाखवुन नांदुरा जि.बुलढाणा पर्यत येण्यास भाग पाडले. नांदुरा पर्यत दुचाकी पाठवुन संबंधितांना वढोदा जंगलात आणुन आरोपी पवार यांच्यासह आणखी पाच-सहा जणांनी या दोघांना बेदम मारहाण केली.झाडाला उलटे टांगून मारहाणीत माजी सैनिक प्रल्हाद पाटील यांचा जागीच मृत्यु झाला तसेच अनिल निकम हे गंभीर जखमी झाले होते.आरोपी एवढ्यावर न थांबता मृतासह जखमी निकम ला पुर्णा नदीच्या पुलावरून खाली टाकुन दिले होते.दरम्यान पाटील यांच्या एटीएम कार्डचा वापर करुन २१५०० रु.व आॅनलाईन २७००० व इतर अशी सर्व रक्कम मिळुन एक लाख सहा हजार पाचशे रुपये आरोपींनी लुटले असल्याचे समोर आले आहे.

सुशिक्षित लोकही फसतात
तालुक्यातील या आदिवासी भागातील हलखेडा,जोंधनखेडा,लालगोटा,मधापुरी,वढोदा आदी परीसरात नागमणी,काळी हळद,मांडुळ सर्प(डबल इंजिन),यासारख्या काल्पनिक वस्तुंचे आमिष दाखवून देशभरातील विविध राज्यांतुन गर्भश्रीमंत व्यक्तीना अलगद जाळ्यात ओढले जाते.वेगवेगळ्या पद्धतीने वस्तु खरी असल्याचे भासवुन संबंधितांना परीसरात निर्जन स्थळी बोलावून पैशांसह मुद्देमालाची लयलुट केली जाते.तसेच एखादेवेळी जीवासही मुकावे लागते.या्प्रकरणातही प्राथमिक चौकशीत दोन तोंडी मांडुळ सर्प तस्करी ची माहिती समोर येत आहे.

पोलीस प्रशासनांकडुनही जनजागृती
तालुक्यातील डोलारखेडा फाट्यासह मुख्य रस्त्याच्या कडेला पोलीस प्रशासनाकडुन अशा प्रकारच्या फसवणुकीपासुन सावधतेचा इशारा देणारे बॅनर लावलेले आहे मात्र तरीही सुशिक्षित लोक भुलपाथांना बळी पडत आहे.