जळगाव लाईव्ह न्यूज । १ सप्टेंबर २०२४ । यावल अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी असल्याची बतावणी करून एकाकडून दुसऱ्यांदा खंडणी मागणाऱ्या दोघाजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा प्रकार चिंचोली (ता. यावल) येथे घडला. आकाश भगवान जावरे (२९, रा. आंबेडकर चौक, नंदुरबार) आणि राहुल श्रीहरी काळे (४३, रा. कात्रज, पुणे) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत.
चिंचोली (ता. यावल) येथील भवानी पेठेत संतोष हरी बडगुजर यांचे किराणा दुकान आहे. त्यांच्या दुकानात ७ जुलै रोजी वरील दोन्ही संशयित आले. आम्ही अन्न व औषध प्रशासन खात्याचे अधिकारी आहोत. गुटखा विकता म्हणून तुमच्याविरुद्ध कारवाई करायची आहे. तुमची पत्नी आणि मुलास अटक होईल, असे सांगून त्यांना धमकी दिली. अटक टाळायची असेल तर दोन लाख रुपये द्यावे
लागतील, अशी मागणी केली. तेव्हा दुकानदाराने त्यांना ५० हजार रुपये दिले. यानंतर शुक्रवार, ३० ऑगस्ट रोजी वरील दोघेजण याच दुकानदाराकडे आले आणि पैशांची मागणी करू लागले. दुकानदाराला संशय आल्याने त्याने पोलिसांना या दोघांबद्दल माहिती दिली. इकडे दुकानदाराने बतावणी करणाऱ्या दोघंना बोलण्यात ठेवले. काही वेळातच पोलिस पथक चिंचोलीत पोहोचले. पथकाने या दोघांनाही ताब्यात घेतले आणि यावल पोलिस ठाण्यात आणले.
दुकानदाराला संशय आल्याने त्याने पोलिसांना या दोघांबद्दल माहिती दिली. इकडे दुकानदाराने बतावणी करणाऱ्या दोघांना बोलण्यात ठेवले. काही वेळातच पोलिस पथक चिंचोलीत पोहोचले. पथकाने या दोघांनाही ताब्यात घेतले आणि यावल पोलिस ठाण्यात आणले. दुकानदार संतोष बडगुजर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनील मोरे, सहायक फौजदार असलम खान, पो. कॉ. वासुदेव मराठे, जाकीर तडवी, राहुल अहिरे यांनी या दोघांना ताब्यात घेतले.