बुधवार, सप्टेंबर 27, 2023

प्राणघातक हल्ला करणाऱ्या दोघांना अटक; चोपडा तालुक्यातील धक्कादायक घटना

जळगाव लाईव्ह न्यूज| ११ ऑगस्ट २०२३। तालुका चोपडा पासून जवळच असलेले सुटकार येथे किरकोळ वादातून, एकावर धारधार गुप्तीने वार करून प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी तिघांविरुध्द अडावद पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अडावद पोलीस स्थानकांत ईश्वर हरी ठाकरे रा.सुटकार यांच्या फिर्यादीनुसार अरुण दामु सोनवणे, अश्विन विनोद सोनवणे, जयेश अरुण सोनवणे ( सर्व राहणार सुटकार ता. चोपडा ) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या तिघांनी किरकोळ वादातून ईश्वर ठाकरे यांचे चुलत भाऊ गणेश भास्कर ठाकरे याला जिवेठार मारण्याच्या उद्देशाने लाकडी दांडके, लोखंडी आसारीसह, धारधार गुप्तीने हल्ला चढवला. तसेच अरुण सोनवणे अश्विन सोनवणे हे दोघे गावात व गल्लीत किरकोळ कारणावरूण भांडण करुण लोकांमंध्ये भीती निर्माण करतात. ठाकरे यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघ आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश बुवा करीत आहे.