⁠ 
रविवार, डिसेंबर 22, 2024
Home | बातम्या | दिवाळीत महागाईचा तडका ; तूरडाळ महागणार? आताचा ‘हा’ आहे भाव..

दिवाळीत महागाईचा तडका ; तूरडाळ महागणार? आताचा ‘हा’ आहे भाव..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ सप्टेंबर २०२३ । अल निनोचा यंदाच्या पावसाळ्यावर परिणाम दिसून आला आहे. जूनमध्ये ओढ दिल्यानंतर जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे खरिपाच्या पेरण्या झाल्या. मात्र त्यांनतर ऑगस्ट महिन्यात चांगलीच दांडी मारली. चालू सप्टेंबर महिन्यात काही दिवस पाऊस झाला असला तरी गेल्या महिन्यात ओढ दिलेल्या पावसामुळे खरिपाचा हंगाम धोक्यात होता. आता उत्पदनात घट होण्याची भीती असून याचा फटका आगामी दिवसात डाळींच्या किमतीवर पाहायला मिळणार आहे.

दरम्यान, सध्या वरण, आमटीला चव देणाऱ्या तूर डाळीचे भाव १८० रुपयांवर भिडले आहे. दोन ते तीन महिने हे दर कमी होण्याची शक्यता नसल्यामुळे दिवाळीत तूर डाळ प्रतिकिलोला २०० रुपयांचा भाव तर घेणार नाही, असा प्रश्न आतापासूनच उपस्थित होऊ लागला आहे.

तूर डाळीचा स्टॉक कमी प्रमाणात बाजारपेठेत आल्याने दरात वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. कोल्हापूरमधील लक्ष्मीपुरी धान्य लाइनमध्ये येणारी ही तूर डाळ विदर्भ, मराठवाडा, खान्देश भागातून येते. विशेषत: बार्शी, लातूर, जळगाव, उदगीर आदी भागांतून तूर डाळ अधिक प्रमाणात येते. गेल्या वर्षी तूर डाळीच्या क्षेत्रात घट झाली. घट झालेल्या क्षेत्रात सोयाबीन, कापूस, अन्य पिकांचे क्षेत्र वाढले. त्यातही सोयाबीनला दर अधिक मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी तूर डाळीपेक्षा सोयाबीन पेरणी अधिक केली. तूर डाळीचे क्षेत्र घटले. विशेष म्हणजे, या वर्षीच तूर डाळ १५० रुपये किलो गेलेली नाहीय. मागील काही काळात असाच दराचा भडका उडाला होता.

मूग, उडीद डाळही महाग
जळगावच्या बाजारपेठेत मूग दाळ १३० ते १४० तर उडीद डाळ १३२ ते १३८ रुपये प्रतिकिलोने विक्री झाली. गेल्यावर्षाच्या तुलनेत यंदाचे भाव जास्तच असल्याचे सांगण्यात आले. यंदा पाऊस लांबल्याने उत्पन्नात घट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या डाळीही महागण्याची शक्यता आहे.

हरभरा डाळ ९० रुपयावर
मागील काही वर्षात हरभरा डाळीचे दर काहीसे वाढले आहे. बुधवारी जळगावात हरभरा डाळीचा दर हा ९० ते ९५ रुपयावर आहे. जेव्हा दसरा दिवाळी येते तेव्हा यात पाच ते दहा रुपयाची वाढ होते.

तूरडाळ १७० रुपयावर
जळगावात सध्या तुरडाळीची १७० ते १८० रुपये प्रति किलोने विक्री सुरु आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.