आजपासून तुळशी विवाहाला सुरुवात ; यंदा लग्नाची विक्रमी धामधूमचा अंदाज, असे आहेत विवाह मुहूर्त?
जळगाव लाईव्ह न्यूज । २४ नोव्हेंबर २०२३ । हिंदू पंचागानुसार कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशीला तुळशी विवाह केला जातो. या दिवसापासून तुळशीच्या लग्नला सुरुवात होते. यंदा हा दिवस आज म्हणजेच २४ नोव्हेंबरपासून साजरा केला जाणार आहे. यानंतर लग्नाची धामधूम सुरू होणार असून यंदा २७ नोव्हेंबरपासून लग्नसराईला सुरवात होणार आहे.
नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये १२ दिवसांच्या लग्नाच्या शुभ मुहूर्तावर अनेक जोडपी लग्नगाठ बांधतील. जुलैपर्यंत तब्बल ६६ मुहूर्त आहेत. यंदा लग्नाची विक्रमी धामधूम राहणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
असे आहेत विवाह मुहूर्त
नोव्हेंबर २७, २८ व २९ या तारखांना विवाह मुहूर्त आहेत.
डिसेंबर : ६ ते ८, १५, १७, २०, २१, २५, २६, ३१.
जानेवारी २०२४ मध्ये २ ते ६, ८.
फेब्रुवारी- १२, १३, १७, १८, २४, २६, २७, २८, २९.
मार्च : ३, ४, ६, १६, १७, २६, २७, ३०.
एप्रिल : १, ३, ४, ५, १८, २०, २१, २२, २६, २८.
मे : १ व २, जून : २९ व ३० जुलै : ११ ते १५