जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मे २०२२ । तुका म्हणे पवारा | नको उडवू तोंडाचा फवारा || ऐंशी झाले आता उरक | वाट पहातो नरक सगळे पडले उरले सुळे | सतरा वेळा लाळ गळे || समर्थांचे काढतो माप | ते तर तुझ्या बापाचेही बाप || ब्राह्मणांचा तुला मत्सर | कोणरे तू ? तू तर मच्छर || भरला तुझा पापघडा | गप! नाही तर होईल राडा || खाऊन फुकटचं घबाड | वाकडं झालं तुझं थोबाड || याला ओरबाड त्याला ओरबाड | तू तर लबाडांचा लबाड ||
अशी पोस्ट अभिनेत्री केतकी चितळे यांनी शरद पवार यांच्याविरुद्ध केल्याने या प्रकरणी त्यांच्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. शरद पवार यांचा अपमान केला म्हणून नेटकरी आता केतकी लाच ट्रोल करत आहेत. मात्र या वादग्रस्त पोस्ट मुळे केतकी चितळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
नेहमीच आपल्या सोशल मीडिया पोस्ट वरुन वादग्रस्त पोस्ट करणारी अशी ओळख असलेली अभिनेत्री केतकी चितळे आता पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तिने यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरुद्ध पोस्ट केली आहे. या पोस्टमुळे ती चांगलीच नेटकऱ्यांकडून करून ट्रोल होत आहे. याआधी वादग्रस्त पोस्ट मुळे वेगवेगळ्या कारणांवरून केतकी चितळे चर्चेत आली होती. दरम्यान आता केलेल्या पोस्टमुळे केतकी चितळे विरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वेळ आली आहे बारामचीच्या गांधी साठी बारामतीचा नथुराम गोडसे तयार करायची… #बाराचाकाकामाफी_माग‘ असं ट्वीट 11 मेरोजी एका तरुणाने केल होत . तरुणाने केलेल्या या ट्विट विरुद्ध पोलिसात तक्रार देण्यात आली होती. आता नाशिक पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. बागलाणकर नावाच्या एका ट्वीटर युजरनं हे ट्वीट केलं होतं. नाशिक ग्रामीणच्या दिंडोरी पोलिसांनी याप्रकरणी कारवाई केली आहे.