जळगाव लाईव्ह न्यूज । १० फेब्रुवारी २०२२ । ट्रक व प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्झिमो गाडीचा भीषण अपघात झाल्याची घटना बुधवारी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील म्हसवे शिवारातील सहयोग हॉटेलजवळ घडलीय. या अपघातात ११ जण जखमी आले आहे.
याबाबत असे की, एरंडोलकडून धुळे येथे जाणारी मॅक्झिमो गाडी (क्र.एम.एच.१४-इ.सी ३५७८) व समोरून येणारा ट्रक (एम.एच-१८-बी.ए.४३११) यांच्यात जबर धडक झाली. यात ११ जण जखमी आले आहे. त्यांच्यावर पारोळा येथील कुटीर रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले. तर गंभीर जखमींपैकी काहींना धुळे तर काहींना जळगावला हलवले.
जखमींचे नावे :
अशोक पाटील (रा.भुसावळ), चंद्रकला जोहरु रखमे, जोहरु नथ्थु रखमे, चंद्रकांत संतोष रखमे (तिघे रा.नाशिक), मॅक्झिमो चालक समाधान संपत पारधी (रा.भालगाव, ता.धरणगाव), आसिफ नथू बागवान, रिजवान आसिफ बागवान, हुसेफ आसिफ बागवान, उमेर आसिफ बागवान (रा.म्हसावद, ता.एरंडोल), उषाबाई छोटू पाटील, छोटू प्रल्हाद पाटील (रा.जैतपीर, ता.अमळनेर) यासह ट्रक मधील काशीराम गुठलिया चौकारीया, सुनील मुठलीया चौकाराम (दोघे रा. सेंधवा) हे जखमी झाले.
हे देखील वाचा :
- जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटीलांचा पुन्हा विजय ; विरोधकांना चारली धूळ
- जळगाव शहरातून राजूमामा भोळे यांची विजयी हॅट्रिक
- महाराष्ट्र्रात पुन्हा महायुतीचे सरकार; ‘या’ 5 मुद्द्यांमुळे मिळाला विजय..
- जळगाव जिल्ह्यात मविआला धोबीपछाड! सर्वच ११ जागांवर महायुतीचा विजय निश्चित
- महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचं सरकार? मविआ सर्वात मोठा धक्का, आताची आकडेवारी वाचा